tata 
विज्ञान-तंत्र

टाटा सफारी रिव्ह्यू: कमबॅक झाला पण खरंच आहे का दमदार.? चला पाहुयात...

कुबेर

टाटा सफारी हे नाव तर सर्वांनाच माहित आहे. सफारी एक दणकट एसयुव्ही म्हणून प्रसिद्ध आहे. ग्राहकांमध्ये आणि विशेषतः मोठी दणकट गाडी हवी असणाऱ्यांमध्ये जबरदस्त लोकप्रिय असलेले नाव म्हणजे सफारी. भारतात गेल्यावर्षी भारत स्टेज ६ ही गाड्यांसाठीची प्रदूषण कमी करणारी नियमावली लागू करण्यात आली त्याचबरोबर भारतात गाड्यांसाठी नवे क्रॅश नॉर्म्स देखील लागू करण्यात आल्याने याची पूर्तता न करणारी आणि अपडेट करण्यास आवाक्याबाहेर खर्च असणारी अनेक मॉडेल्सची निर्मिती अनेक कंपन्यांनी थांबवली. याच नाव होते ते म्हणजे टाटा सफारीचे. अनेकांनी याबाबत निराशा व्यक्त केली तर भविष्यात नवीन मॉडेल येईल अशी आशा होती. ऑटो एक्स्पो मध्ये टाटाने ग्राविटास नावाने एक गाडी सादर केली होती आणि आता तीच गाडी टाटा ने सफारी नावाने नुकतेच लाँच केली आहे. चला तर जाणून घेऊयात टाटा सफारीच्या कमबॅक बद्दल आणि जाणून घेऊयात खरंच सफारी दमदार आहे का.?

सफारी दिसते कशी.?

समोरून पहिले तर तुम्ही नक्की म्हणाल की ही तर टाटा हॅरियर आहे. होय, कशी अंशी तुम्ही बरोबर आहात. हॅरियर आणि सफारी एकाच प्लॅटफॉर्म वर बनल्या आहेत तसेच समोरून साधारण एकसारख्याच दिसतात फरक एवढाच की सफारीचे ग्रील क्रोम आहे. बाकी हॅरियर पेक्षा सफारी लांबीला जास्त असून दुसऱ्या दरवाज्यापर्यंत एकसारख्या दिसतात. मागील बाजूने डिझाइन वेगळे असून नवीन टेल लाईट आहेत तसेच डिक्कीचा उंच दरवाजा आहे.

इंटिरियर कसे आहे.?

आतमध्ये बसल्यावर नक्कीच एका मोठ्या गाडीत बसल्याचा अनुभव येईल. आतील डिझाईन देखील हॅरियरच्या डिझाइनशी मिळते जुळते आहे. अतिशय सुंदर क्वालिटीचे मटेरिअल्स वापरण्यात आले आहेत आणि नक्कीच एक छान आणि सुंदर इंटेरियर या गाडीमध्ये आहे. ऑईस्टर व्हाईट थीमचे इंटेरियर यात दिले आहे आणि ते नक्कीच एक प्रीमियम अनुभव देण्यात यशस्वी ठरते. टॉप मॉडेल मध्ये हँडब्रेक लिव्हर नसून इलेक्ट्रॉनिक हँडब्रेक देण्यात आला आहे. समोरची काच अतिशय मोठी असल्याने समोरच्या गाड्या आणि रस्ते दिसण्यात चालकाला कोणताही अडथळा येत नाही. ८.८ इंचाचे टचस्क्रीन देखील सफारी मध्ये आहे यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले देण्यात आले आहे. गाडीच्या भव्यतेच्या तुलनेत हे टचस्क्रीन थोडे छोटे वाटते तसेच मागील कॅमेरा वरील चित्र स्पष्ट दिसत नाहीत. सफारीतील उत्तम गोष्ट म्हणजे भले मोठे सनरूफ आणि दमदार JBL ची म्युझिक सिस्टिम. टाटाच्या ऍप्प द्वारे गाडीबद्दल अनेक गोष्टी तुम्हाला कळतात तसेच गाडीचे अनेक फंक्शन देखील वापरता येतात.

सुरक्षित आहे का.?

टाटाच्या इतर गाड्यांनी ग्लोबल NCAP मध्ये जबरदस्त क्रॅश रेटिंग मिळवल्याने ग्राहकांचा विश्वास वाढला असून टाटा मोटर्सच्या सर्व गाड्या अतिशय सुरक्षित आणि दणकट मानल्या जातात. टाटा सफारीची क्रॅश टेस्ट अजून झालेली नाही पण लँडरोव्हरच्या प्लँटफॉर्म वर आधारित असल्याने सफारी देखील अतिशय सुरक्षित असणार आहे.सुरक्षेच्या दृष्टीने एअरबॅगस् , एबीएस, ब्रेक असिस्ट, डिस्क ब्रेक्स असे फीचर्स देण्यात आले आहेत.

स्पेस आणि कंफर्ट आहे का.?

पूर्वीची टाटा सफारीमध्ये प्रवाशांसाठी भरपूर जागा होती आणि तशीच जागा नवीन सफारी मध्ये देखील आहे. हॅरियर पेक्षा उंच असल्याने हेडरूम देखील भरपूर आहे आणि उंच लोकांना देखील आरामात बसता येईल. थिएटर प्रकारचे सीटिंग यात असून पुढील सीटच्या तुलनेत मधल्या सीट्स उंचीवर आहेत आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या रांगेतील सीट्स देखील. या गाडीमध्ये ७ लोकांची आसनक्षमता आहे तसेच ६ सीटचा पर्याय देखील उपलब्ध आहे ज्यामध्ये मधल्या रांगेत फक्त दोन कॅप्टन सीट असणार आहेत. सीट्स अतिशय कम्फर्टेबल असून प्रवाशांना लांबच्या प्रवासात देखील थकवा जाणवणार नाही एवढं नक्की. दोन युसबी पोर्ट देखील दुसऱ्या रांगेत देण्यात आले असून तुम्हाला फोन चार्ज करणे सोपे जाणार आहे. तिसऱ्या रांगेतील सीट्स शक्यतो छोट्या मुलांसाठी असतात असे मानले जाते पण सफारी मधील तिसऱ्या रांगेत मोठ्या लोकांना देखील बसता येईल एवढी जागा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेकरिता एसी वेन्ट देखील देण्यात आले असून प्रवाशांच्या कम्फर्टकडे व्यवस्थित लक्ष देण्यात आले आहे.

किती सामान नेता येईल.?

७३ लिटरची डिक्की असून खूप जास्त बॅग त्यात ठेवता येणार नाहीत पण तिसऱ्या रांगेतील सीट्स फोल्ड केल्याने ज्यादा जागा मिळते आणि जास्त सामान नेता येईल.

आता सर्वात मोठा प्रश्न, दमदार परफॉर्मन्स आहे की नाही.?

टाटा सफारी मध्ये २००० सीसी चे इंजिन असून हेच इंजिन हॅरियर मध्ये देखील पाहायला मिळते. टाटा मोटर्स या इंजिनला क्रायोटेक असे म्हणतात. १७० बीएचपी ची ताकद या इंजिनमध्ये आहे. ६ स्पीड ट्रान्समिशन देखील देण्यात आले असून ऑटोमॅटिकचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. क्लच थोडा हार्ड असून गियर टाकण्यास थोडा ताकदीचा वापर करावा लागेल. मॅन्युअलच्या तुलनेत ऑटोमॅटिक जास्त वरचढ असल्याचे चालवताना जाणवते. ऑटोमॅटिक स्मूथ असून गियर अतिशय स्मूथ पद्धतीने शिफ्ट होतात आणि ते तुम्हाला जाणवत देखील नाही. ऑटोमॅटिक गियर बॉक्स ह्युंदाई कडून घेण्यात आला आहे. हे इंजिन डिझेल असल्याचे नक्कीच तुम्हाला जाणवेल कारण तास आवाज देखील येतो पण तो आवाज त्रासदायक नक्कीच नाहीये. हे इंजिन अतिशय पॉवरफुल असून ऍक्सीलेटर वर पाय देताच तुम्हाला हवी तेवढी ताकद इंजिनकडून मिळते. इको, स्पोर्ट आणि सिटी हे ड्रायव्हिंग मोड देखील सफारी मध्ये असून याने गाडी चालवण्याचा अनुभव नक्कीच सुधारतो. सफारी भरपूर वेगाने जाऊ शकते आणि त्याच दृष्टीने टाटाने चारही चाकांना डिस्क ब्रेक दिले असून सफारीचे ब्रेकिंग अतिशय उत्तम आहे. स्टिअरिंग थोडे जड असल्याचे जाणवते. सफारीचे सस्पेन्शन अतिशय जबरदस्त असून खराब रस्ते आणि खड्ड्यांवरून देखील सफारी सहजपणे जाते आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देते आणि यामुळेच सफारी अतिशय दणकट असल्याचे स्पष्ट दिसते. ४ x ४ चा पर्याय नवीन सफारी मध्ये उपलब्ध नसला तरीही ' वेट ' आणि ' रफ ' असे मोड देण्यात आले आहेत ज्यामुळे अगदीच जिथे रस्ता नाही अश्या ठिकणी देखील सफारी जाऊ शकते आणि ग्राउंड क्लीअरन्स देखील भरपूर असल्याने मदत होते. टाटा भविष्यात ४ x ४ प्रणालीचा पर्याय सफारीमध्ये उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. प्रश्नाचे उत्तर थोड्या शब्दात द्यायचे झाले तर नवीन टाटा सफारी नक्कीच दमदार आहे.

सर्वांचा आवडता प्रश्न, किंमत किती आहे आणि नवीन सफारी घ्यावी का.?

नवीन सफारीची किंमत १४.६९ लाख रुपयांपासून सुरु होऊन २१.४५ लाखांपर्यंत जाते (एक्स शोरूम दिल्ली). एमजी हेक्टर, महिंद्रा XUV५०० हे सफारीचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. सुंदर, आरामदायी, दणकट असणारी नवीन टाटा सफारी तुमच्या परिवारासाठी नक्कीच एक जबरदस्त आणि उत्तम पर्याय आहे आणि तुमचे बजेट असल्यास नक्कीच टाटा सफारी घरी घेऊन येण्याचा विचार नक्की करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT