Tata Tiago Sakal
विज्ञान-तंत्र

Tata घेऊन येतेय स्वस्तात मस्त सीएनजी कार, काय असतील फीचर्स?

सकाळ डिजिटल टीम

Tata Motors CNG Cars : भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) त्यांच्या आगामी सीएनजी (CNG) कार लवकरच बाजारात आणण्याबाबत माहिती दिली आहे, टाटा मोटर्सने अलीकडेच घोषणा केल्यानुसार कंपनी 19 जानेवारी रोजी त्यांची नवीन सीएनजी कार रेंज लॉंच करणार आहे. मात्र कंपनीने अद्याप कोणते मॉडेल सादर केले जातील हे जाहीर केलेले नाही. दरम्यान टियागोचे (Tiago) नवीन सीएनजी व्हेरिएंट समोर येतील अशी अपेक्षा आहे. नवीन सीएनजी कारचे अनऑफिशीयल बुकिंगही सुरू झाली आहे.

Tiago CNG ही Tata द्वारे भारतात लाँच केलेली पहिली CNG कार असेल. याशिवाय, कंपनी टिगोर सब-कॉम्पॅक्ट सेडान, अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅक, नेक्सॉन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीसह इतर मॉडेल्समध्ये देखील आपली CNG लाइनअप विस्तार करणार आहे.

या महिन्यात लाँच होणार्‍या टियागो सीएनजीमध्ये नवीन सीएनजी किट वगळता फारसा बदल दिसणार नाही. तसेच, नवीन किट स्वतंत्र ICNG बॅजिंग देण्यात येईल, जे त्यास त्यांच्या प्रतिस्पर्ध्यी कार पेक्षा वेगळे असणार आहे. टियागोसाठी फॅक्टरी-फिटेट सीएनजी किटबद्दल अद्याप टेक्निकल डिटेल्स अद्याप समोर आलेले नसले तरी, ते सुमारे 30 किमी/किलो मायलेज देईल अशी अपेक्षा आहे.

Tiago सीएनजी कार सारखेच 1.2 लिटर, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात येण्याची शक्यता आहे. पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले इंजिन, जे कलानल 85 BHP आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. Tata Tiago CNG कारची थेट स्पर्धा ही मारुती वॅगनआर (WagonR CNG) किंवा Hyundai Santro CNG असणाक आहे

Tiago CNG मध्ये खास काय असेल

Tata Tiago CNG कार मध्ये मॉडेलच्या पुढील बाजूस सध्याची ट्राय-एरो थीम असलेली ग्रिल पाहायला मिळेल. यासोबतच यात एलईडी हाय माऊंट स्टॉप लॅम्प, एलईडी टेल लाइट्स, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, फॉग लॅम्प, शार्क फिन अँटी देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT