टाटा मोटर्सने नुकतीच त्यांची नवीन टिआगो ‘एनआरजी’ भारतीय बाजारात दाखल केली आहे. ही कार खास ग्राहकांच्या इच्छा आणि आवडीनुसार अनोख्या डिझाईन करण्यात आली आहे. ‘अर्बन टफरोडर’ म्हणून दर्जा असलेली टिआगो एनआरजीच्या लूकमध्ये अधिक आकर्षकता आणण्याचा प्रयत्न टाटाने केला आहे. जीएनसीएपीकडून ४ स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली ही कार फोरेस्टा ग्रीन, फायर रेड, स्नो व्हाईट, क्लाऊडी ग्रे या ४ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. तिची एक्स शोरूम किंमत ६.५७ लाख ते ७.०९ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. (tata tiago nrg facelift 2021 launched in india know price features and details in india)
"अत्यंत लोकप्रिय ‘हॅचबॅक’ टाटा टिआगोचे हे सर्वोत्तम व्हर्जन सादर करताना फार आनंद होतोय. ही कार बाहेरून आकर्षक दिसण्यासोबत आतील भागामध्ये वैशिष्ट्यपूर्ण व स्टायलिश आहे. ही कार अत्यंत आनंददायी ड्राईव्हचा अनुभव देईल", असा विश्वास टाटा मोटर्सच्या पीव्हीबीयूच्या सेल्स, मार्केटिंग व कस्टमर केअरचे उपाध्यक्ष राजन अंबा यांनी व्यक्त केला.
टिआगो एनआरजीची वैशिष्ट्ये -
१. टाटा टिआगो एनआरजीला काळ्या रंगातील रुफ देण्यात आले आहे. तसेच चारही बाजूंनी बॉडी क्लाऊडिंग आणि काळ्या रंगातील ओआरव्हीएम दिले आहे.
२. कारचा ग्राऊंड क्लिअरन्स १८१ मिमी इतका असून, १५ इंचाचे ॲलॉय व्हिल आहेत. खराब रस्त्यांवर व्यवस्थित चालण्यासाठी या कारमध्ये ड्युअल पाथ सस्पेन्शन दिले आहे.
३. कारच्या केबिनमध्ये चारकोल ब्लॅक थीमचा वापर करण्यात आला आहे. तसेच इंजिन स्टार्ट-स्टॉप बटन, ७ इंचिचा इन्फोटेन्मेंट सिस्टिम जो अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोला सपोर्ट करतो.
४. टाटा टिआगोमध्ये ११९९ सीसी, १.२ लिटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन दिले असून, जे ८५ बीएच पॉवर देते. यामध्ये ५ स्पिड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे.
५. सुरक्षेच्या दृष्टिने ड्युअल फ्रंट एअर बॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, फॉलो मी लॅम्प आदी फीचर्स देण्यात आले आहे. टिआगो २०१६मध्ये लाँच झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.