Tata Upcoming Cars eSakal
विज्ञान-तंत्र

Tata Upcoming Cars : 'टाटा'चीच गाडी घ्यायची असेल तर थोडं थांबा.. लवकरच येतायत तीन नव्या SUV; नवा इलेक्ट्रिक पर्यायही मिळणार

सकाळ डिजिटल टीम

Tata Upcoming SUV Cars : तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, आणि तुम्हाला फक्त टाटाचीच गाडी घ्यायची असेल.. तर थोडं थांबा. कारण टाटा मोटर्स आता तीन नव्या एसयूव्ही कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका इलेक्ट्रिक कारचाही समावेश असणार आहे.

विदेशी कार कंपन्याच्या तुलनेत भारतीय ग्राहकांमध्ये देशी कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स पसंतीस उतरली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या विक्री दरात वाढ होत चालली आहे. या दरम्यान टाटा पंच आणि नेक्सन या कंपनीच्या बेस्ट सेलिंग कार बनल्या आहेत. टाटा पंच ही देशातील सर्वात अधिक विक्री होणारी गाडी आहे. हाच दबदबा कायम ठेवण्यासाठी आता टाटा आपल्या ताफ्यामध्ये आणखी तीन गाड्या जोडणार आहे.

Tata Curvv EV

भारतात इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचं निर्विवाद वर्चस्व आहे. भारतात होणाऱ्या एकूण इलेक्ट्रिक कार विक्री मध्ये टाटाचा ७०% पेक्षा जास्त वाटा आहे. हाच दबदबा कायम ठेवण्यासाठी येत्या काही महिन्यात कंपनी 'टाटा कर्व EV' लॉन्च करणार आहे. काही दिवसांपूर्वीच ही कार शोरुम ला शोकेस केली गेलीय. मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कर्व्ह Ev ही गाडी सिंगल चार्जवर तब्बल ५०० किलोमीटर पेक्षा जास्त रेंज ऑफर करू शकते.

Tata Curvv ICE

टाटा मोटर्सने नुकतेच नवी दिल्लीत झालेल्या २०२४ भारत मोबेलीटी ग्लोबल एक्स्पो मधे Tata Curve Ice ही SUV कार शोकेस केली होती. या गाडीमध्ये १.५ लिटर डिझेल इंजिन देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या मार्केटमध्ये असणाऱ्या ह्युंडाई क्रेटा, किया सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि होंडा एलिवेट या गाड्यांना टाटाची नवी कर्व्ह ICE चांगली टक्कर देईल.

Tata Punch Facelift

यासोबतच टाटा आपल्या बेस्ट सेलिंग पंच या कारचं फेसलिफ्ट व्हर्जन देखील लवकरच मार्केट मध्ये आणण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अपग्रेडेड इंटेरिअर आणि एक्स्टेरिअर पहायला मिळतील. मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, पंच फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कित्येक मॉडर्न फीचर्स बघायला मिळतील. अद्याप कंपनीने अधिकृतरित्या या एसयूव्ही लॉन्चच्या तारखांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. तरी अनेक ग्राहक या कारच्या लाँचिंगची प्रतिक्षा करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT