Tata Motors Electric SUV eSakal
विज्ञान-तंत्र

Tata Motors : इलेक्ट्रिक मार्केटवर राज्य करण्यासाठी टाटा मोटर्स सज्ज; भारतात आणणार तीन दमदार ई-एसयूव्ही

Sudesh

टाटा मोटर्स भारतामध्ये येत्या काळात तीन नव्या इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. Tata Punch EV, Curvv EV आणि Harrier EV अशा या तीन गाड्या असणार आहेत. या गाड्या 2024 साली लाँच होण्याची शक्यता आहे.

Tata Punch EV

अल्पावधीत एकदम लोकप्रिय झालेल्या टाटा पंचचं इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच लाँच होणार आहे. पुढच्या बाजूला चार्जिंग पोर्ट देणारी ही पहिली टाटाची ईव्ही असणार आहे. टाटा पंच ईव्हीमध्ये नवीन प्रकारचं स्टिअरिंग व्हील, कॅपेसिटीव्ह एचव्हीसी नियंत्रण आणि टचस्क्रीन असणारं अ‍ॅडव्हान्स इंटेरिअर देण्यात येणार आहे.

Tata Curvv EV

टाटा कर्व्ह गाडीमध्ये ट्विन इलेक्ट्रिक मोटर सेटअप देण्यात येणार आहे. याची रेंज एका चार्जमध्ये सुमारे 500 किलोमीटर एवढी असणार आहे. यावर्षीच्या सुरुवातीला एक्सपोमध्ये कर्व्ह कॉन्सेप्ट कार प्रदर्शित करण्यात आली होती. या कारसारखंच कर्व्ह ईव्हीचं डिझाईन असणार आहे. यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, डिजिटल क्लस्टर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल पेन सनरुफ असे फीचर्स मिळणार आहेत. (Tech News)

Tata Harrier EV

एसयूव्ही कार्समध्ये टाटाची हॅरिअर गाडी भरपूर लोकप्रिय आहे. या गाडीचं इलेक्ट्रिक व्हर्जन 4x4 क्षमतेचं असेल असं सांगण्यात येत आहे. याची रेंज 500 किलोमीटरपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. याच्या इंटेरिअरमध्ये टाटा हॅरिअर फेसलिफ्टप्रमाणे फीचर्स असतील असंही म्हटलं जात आहे. अर्थात, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT