Semiconductor Plant in India eSakal
विज्ञान-तंत्र

Tata Semiconductor Plant : भारतात सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी 'टाटा'ला ग्रीन सिग्नल; गुजरातमध्ये उभारणार पहिला प्लांट

Cabinet approves 3 chip plants, including two by Tata, at estimated investment of Rs 1.26 lakh crore: टाटा कंपनी तैवानच्या पॉवरचिप सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्परेशन (PSMC) या कंपनीसोबत मिळून गुजरातमध्ये देशातील पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारणार आहे.

Sudesh

India’s First Semiconductor Fab facility : भारतातच सेमीकंडक्टरचे उत्पादन घेण्यासाठी मोदी सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारकडे सेमीकंडक्टर प्लांटसाठी टाटा आणि इतर कंपन्यांनी अब्जावधींचे प्रस्ताव मांडले होते. यातील 'टाटा ग्रुप'च्या प्रस्तावाला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. यामुळे 'मेक इन इंडिया' अभियानाला मोठा बूस्ट मिळणार आहे.

देशात एकूण तीन सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहेत. यातील दोन प्लांट गुजरातमध्ये तर तिसरा आसाममध्ये असणार आहे. इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. टाटा कंपनी तैवानच्या पॉवरचिप सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्परेशन (PSMC) या कंपनीसोबत मिळून गुजरातमध्ये देशातील पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारणार आहे. (Green signal to 'Tata' to manufacture semiconductors in India; The first plant to be set up in Gujarat)

गुजरातच्या धोलेरा गावात हा पहिला प्लांट उभारण्यात येईल. यासाठी 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्लांटमध्ये ऑटोमोटिव्ह, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, डेटा स्टोरेज, डिस्प्ले ड्रायव्हर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सेक्टर अशा विविध सेक्टर्ससाठी सेमीकंडक्टर चिप्स बनवण्यात येतील.

टाटाचा दुसरा सेमीकंडक्टर प्लांट हा आसामच्या मोरीगांवमध्ये उभारण्यात येणार आहे. आसाममधील प्लांटसाठी 'टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. (Government approves 3 semiconductor units in India, Tata Group to set up two)

गुजरातमध्ये आणखी एक प्लांंट

गुजरातच्या साणंद गावामध्ये देखील एक सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे. सीजी पॉवर (CG Power) आणि जपानची रेनेसा कंपनी मिळून याठिकाणी 7,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्लांटमध्ये दिवसाला तब्बल 15 मिलियन चिप्स तयार होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. याव्यतिरिक्त अमेरिकेतील मेमरी चिप बनवणारी कंपनी मायक्रॉन (Micron) ही गुजरातमध्ये आधीपासूनच 22,516 कोटींची गुंतवणूक करून चिप असेंब्ली युनिट उभारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT