EasyToEV Campaign by Tata.ev: Dispelling Myths and Encouraging EV Adoption esakal
विज्ञान-तंत्र

TATA E-Cars : Tata.evची #EasyToEV मोहीम सुरु; कारबद्दल सर्व मिथक होणार दूर

Saisimran Ghashi

TATA : टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. (टीपीईएम) या टाटा मोटर्स लि.ची उपकंपनी आणि भारतातील इलेक्ट्रिक वेईकल (ईव्‍ही) क्रांतीमधील अग्रणी कंपनीने ईव्‍हीसंदर्भातील मिथकांना दूर करणारी मोहिम #EasyToEV लाँच केली. ही मोहिम ग्राहकांना जागरूक करण्‍यासाठी आणि ईव्‍हींसंदर्भातील मिथकांना दूर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे फेंस सिटर्स आणि संभाव्‍य ग्राहकांमध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण होईल.

ही मोहिम प्‍लॅटफॉर्म्सवर लाँच करण्‍यात आली आणि अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी टाटा आयपीएल २०२४ दरम्‍यान देखील प्रचार करण्‍यात आली.

ही मोहिम गेल्‍या वर्षी टाटा आयपीएल २०२३ दरम्‍यान लाँच करण्‍यात आलेल्‍या Tata.ev च्‍या व्हिडिओजच्‍या ‘go.ev’ सिरीजचे विस्‍तारीकरण आहे,

जी ईव्‍हीचा अवलंब करण्‍यासंदर्भात विविध कारणांचे निराकरण करते. भारतातील ईव्‍ही ग्राहकांच्‍या भावी पिढीला सक्षम करण्‍याचा मनसुबा असलेली यंदाची #EasyToEV मोहिम संबंधित, हलक्‍या-फुलक्‍या शब्‍दचित्रांच्‍या सिरीजच्‍या माध्‍यमातून प्रमुख अडथळ्यांचे निराकरण करते, ज्‍यामधून अधिक प्रभाव व प्रचाराची खात्री मिळते. नाविन्‍यतेप्रती कटिबद्ध आणि शाश्‍वत भविष्‍य संपादित करण्‍याच्‍या प्रयत्‍नासह या मोहिमेने ईव्‍ही अवलंबतेबाबत सतत चर्चांना चालना दिली आहे.

लहान, पण साध्‍या कथानकाच्‍या माध्‍यमातून सिरीजमधील व्हिडिओज ईव्‍हींशी संबंधित मुलभूत मिथकांना दूर करते. ही सिरीज ईव्‍ही लांबच्‍या प्रवासासाठी परिपूर्ण सोबती असल्‍याचे दाखवत सुरू होते, ज्‍यामुळे रेंजबाबतची चिंता दूर होते आणि विविध व्हिडिओजच्‍या माध्‍यमातून पुढील सारख्‍या मिथकांचे निराकरण करण्‍यात आले आहे.

मिथक

  • ईव्‍ही चार्जिंग करण्‍यासाठी खूप वेळ लागतो.

  • ईव्‍हीची बॅटरी तिच्‍या वॉरंटीपर्यंतच टिकून राहते.

  • ईव्‍ही खरेदी करण्‍यासह देखरेख ठेवण्‍यास खर्चिक आहे.

  • ईव्‍ही खरेदी करण्‍यास महाग आहेत.

  • बऱ्याच लोकांकडे ईव्‍ही नाही.

  • भारतात फारसे चार्जिंग स्‍टेशन्‍स नाहीत.

  • पावसामध्‍ये ईव्‍ही चालवणे धोकादायक आहे.

  • ईव्‍ही चार्जिंग करणे सहजसाध्‍य नाही.

निराकरण

  • फक्‍त २० मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये Tata.ev १०० किमीची रेंज देऊ शकते.

  • ईव्‍हीची बॅटरी स्‍मार्टफोन किंवा टॅब्‍लेट यांसारख्‍या इतर कोणत्‍याही ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक डिवाईसप्रमाणे तिच्‍या वॉरंटीपेक्षा अधिक काळ टिकून राहते.

  • ईव्‍हीमधील कमी पार्टसमुळे देखरेखसाठी कमी खर्च होतो.

  • ईव्‍ही पेट्रोल-संचालित वाहनांच्‍या तुलनेत ५ वर्षांमध्‍ये ४.२ लाख रूपयांहून अधिक बचत करते.

  • रस्‍त्‍यावर १.५ लाखाहून अधिक Tata.evs धावत आहेत आणि आकडेवारी वाढत आहे.

  • भारतात सध्‍या १२,००० हून अधिक सार्वजनिक चार्जिंग स्‍टेशन्‍स आहेत.

  • ईव्‍हीची मोटर व बॅटरी आयपी६७ प्रमाणित आहे, तसेच जलरोधक व धूळरोधक आहे.

  • ईव्‍ही चार्जिंग करणे विनासायास आहे आणि घरामध्‍ये सहजपणे चार्ज करता येऊ शकते.

Tata.evचे मुलभूत आधारस्‍तंभ समुदाय, तंत्रज्ञान व शाश्‍वततेशी बांधील राहत ही मोहिम ईव्‍हींचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती कंपनीच्‍या कटिबद्धतेला सादर करते. फेंस-सिटर्स आणि निंदा करणाऱ्यांशी परस्‍परसंवाद साधत व संलग्‍न होत #EasyToEV मोहिम 'लाइफ इज ईजी विथ अॅन ईव्‍ही' कसे आहे हे दाखवून देते.

तसेच, ही मोहिम संभाव्‍य ग्राहकांमध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण करत भारतात Tata.ev साठी विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍याला देखील चालना देत आहे. मेट्रो उदयोन्‍मुख बाजारपेठांपर्यंत ईव्‍ही विभागात मोठी वाढ दिसून येत आहे, जेथे आर्थिक वर्ष २४ मध्‍ये वार्षिक ९० टक्‍के वाढ झाली आहे. कंपनीचा देशामध्‍ये ईव्‍हींचा अवलंब वाढवण्‍याच्‍या भारताच्‍या शाश्‍वत गतीशीलता प्रवासामधील या संधीचा फायदा घेण्‍याचा मनसुबा आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT