Elon Musk : इलॉन मस्कच्या घरात आनंदाची बातमी आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना तिसरे मूल झालं आहे. हे तिसरे बाळ शिवॉन झिलिस हिच्या पोटी जन्माला आली आहे. झिलिस ही मस्कची न्यूरलिंक कंपनीमध्ये ऑपरेशन्स आणि स्पेशल प्रोजेक्ट्सची डायरेक्टर आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्यांना झिलिसपासून जुळी मुले झाली होती.
इलॉन मस्क आता एकाच वेळी तीन वेगवेगळ्या नात्यांमधून वडिल झाले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नी जस्टीन मस्कपासून त्यांना पाच मुले आहेत, तर कॅनेडियन संगीतकार ग्रिम्सपासून तीन मुले आहेत. या नव्या बाळाच्या आगमनानंतर त्यांच्या मुलांची संख्या 12वर पोहोचली आहे.
मस्क आणि झिलिस यांच्यातले वैयक्तिक संबंध 2022 पूर्वी फारशी प्रकाशात आले नव्हते. त्यावर्षी त्यांनी आपल्या जुळ्या मुलांची आडनावे बदलण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये मुलांच्या मधल्या नावांमध्ये मस्क आणि झिलिस यांचे आडनाव समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती.
मस्कचे Biographer वाल्टर आयजॅकसन यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांच्या नात्याविषयी काही माहिती दिली. त्यांनी मस्क आणि झिलिस यांच्यासोबत त्यांच्या जुळ्या मुलांचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमधून त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्याची एक झलक पाहायला मिळाली. आयजॅकसन यांनी झिलिसच्या ऑस्टिन येथील घरातील घडलेल्या एका प्रसंगाचे वर्णन केले. त्यावेळी झिलिसची जुळी मुले खेळत असताना, मस्क कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) संभाव्य धोक्यांबद्दल चर्चा करत होते.
झिलिस गेल्या काही वर्षांपासून मस्कच्या प्रोफेशनल सर्कलमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती आहे. २०१७ मध्ये त्यांनी मस्क सह-संस्थापक असलेल्या न्यूरलिंक या कंपनीमध्ये प्रवेश केला. न्यूरलिंक हे मेंदू- संगणक संवाद साधण्यासाठी शरीरात रोपता येणारे उपकरण विकसित करण्यावर काम करते. न्यूरलिंकमध्ये येण्यापूर्वी झिलिस ही मस्कने सह-संस्थापना केलेल्या आणखी एका उपक्रमात ओपनएआयमध्ये कार्यरत होती. ओपनएआय हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवतेच्या हितासाठी व्हावा यावर भर देणारे उपक्रम आहे.
कॅनडामधील मार्खम येथे जन्मलेल्या झिलिस यांनी येल विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. तिथे त्या महिलांच्या आइस हॉकी संघात गोलकीपर होत्या. त्यांनी अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञाना विषयांतून पदवी घेतली.झिलिस यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात आयबीएममध्ये केली. नंतर त्या ब्लूमबर्ग बीटा या कंपनीमध्ये गेल्या आणि शेवटी ओपनएआय आणि न्यूरलिंक या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.