Tech Layoffs eSakal
विज्ञान-तंत्र

Tech Layoffs : नववर्षाच्या पहिल्या 15 दिवसांमध्येच 46 टेक कंपन्यांनी केली तब्बल 7,500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! - रिपोर्ट

जगभरातील टेक कंपन्यांमधून 2022 आणि 2023 या वर्षांमध्ये 4,25,000 कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं होतं. यामधील 36 हजारांहून अधिक कर्मचारी भारतातील होते.

Sudesh

Tech Layoffs in 2024 : नवीन वर्ष सुरू होऊन अजून केवळ दोन आठवडेच पूर्ण झाले आहेत. मात्र, या कालावधीमध्ये जगभरातील तब्बल 46 टेक कंपन्यांनी आपल्या तब्बल 7,500 हून अधिक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. ही संख्या अजूनही वाढत असून, आणखी कंपन्या देखील लेऑफसाठी सज्ज असल्याची माहिती एका रिपोर्टमध्ये समोर आली आहे.

लेऑफ डॉट एफवायआय (layoff.fyi) या कंपनीने ही आकडेवारी समोर आणली आहे. टेक सेक्टरमधील नोकऱ्यांना ही कंपनी ट्रॅक करते. 14 जानेवारी 2024 या दिवसापर्यंत 46 टेक कंपन्यांमधील 7,528 कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं आहे. यामध्ये कित्येक स्टार्टअप कंपन्यांचाही समावेश आहे.

जगभरातील टेक कंपन्यांमधून 2022 आणि 2023 या वर्षांमध्ये 4,25,000 कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं होतं. यामधील 36 हजारांहून अधिक कर्मचारी भारतातील होते. (Tech Layoffs India)

यंदा कोणी कोणी केलं लेऑफ?

यावर्षी फ्रंटडेस्क (Frontdesk) नावाच्या स्टार्टअप कंपनीने लेऑफची सुरुवात केली. या कंपनीने आपल्या सर्व 200 कर्मचाऱ्यांना केवळ एक गुगल मीटवर कॉल करुन काढून टाकलं. यानंतर युनिटी (Unity Layoff) या गेमिंग कंपनीने आपला 25 टक्के स्टाफ कमी केला. यामध्ये सुमारे 1,800 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. गुगलनेही (Google layoffs) मागील आठवड्यात आपल्या हार्डवेअर, कोअर इंजिनिअरिंग आणि असिस्टंट टीममधील काही कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. (Layoffs in 2024)

अमेझॉनच्या ऑडिओबुक (Audiobook Layoff) कंपनीतून देखील 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. मेटा (Meta) कंपनीने इन्स्टाग्रामच्या काही टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर्सना काढून टाकलं आहे. वीअम सॉफ्टवेअर (Veeam Software) या कंपनीने आपल्या 300 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे.

डिज्नीचा पिक्सार (Pixar Layoff) हा अ‍ॅनिमेशन स्टुडिओ देखील लेऑफसाठी सज्ज झाला आहे. तसंच, मोठी बँकिंग कंपनी सिटीग्रुप (CityGroup) देखील पुढील दोन वर्षांमधअये सुमारे 20 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. यामुळे यंदाचं संपूर्ण वर्षच लेऑफचं असण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवण्यात येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT