Modi Government on AI eSakal
विज्ञान-तंत्र

Govt on AI : 'एआय' प्रॉडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी; मोदी सरकारची टेक कंपन्यांना सूचना.. जारी केली अ‍ॅडव्हायजरी

Modi Govt Advisory : एआयचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. यावेळी मंत्रालयाने एआयच्या गैरवापराबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना देखील ताकीद दिली आहे.

Sudesh

IT Ministry Advisory to AI Companies : मोदी सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने टेक कंपन्यांसाठी एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतात एआय प्रॉडक्ट लाँच करण्यापूर्वी आता कंपन्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही सूचना तात्काळ लागू करावी, आणि 15 दिवसांच्या आत अ‍ॅक्शन-कम-स्टेटस रिपोर्ट द्यावा असंही सर्व कंपन्यांना सांगण्यात आलं आहे.

एआयचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. यावेळी मंत्रालयाने एआयच्या गैरवापराबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना देखील ताकीद दिली आहे. सर्व इंटरमीडियरी आणि प्लॅटफॉर्म्सनी एआयमुळे यूजर्सना होणारे नुकसान, मिसइन्फॉर्मेशन आणि विशेषतः डीपफेक संबंधित नियमांचं पालन करावं असं मंत्रालयाने म्हटलं आहे. (Modi Government on AI)

एआय कंटेंटसाठी नियम

सरकारने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायजरीमध्ये एआय-कंटेंट डिटेक्शनसाठी नवा नियम सांगण्यात आला आहे. एआय आधारित कंटेंट अपलोड किंवा शेअर करताना त्यासोबत मेटा-डेटा किंवा अन्य ट्रेसेबल गोष्टीसोबतच तो शेअर करण्यात यावा. यामुळे, डीपफेक किंवा फेक न्यूज शेअर केली जात असेल, तर त्याचा सोर्स शोधता येणं शक्य होणार आहे. एबीपीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (New rule for AI content)

लाँच करण्यापूर्वीच खबरदारी गरजेची

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) म्हणाले, की एआय प्रॉडक्ट्स लाँच करण्यापूर्वीच आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. यामुळेच ही नवी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. कंपन्यांना एखाद्या एआय मॉडेलची चाचणी घ्यायची असेल तरीही सरकारची परवानगी घेणं गरजेचं असेल, असंही ते म्हणाले. (Permission to launch AI products)

डीपफेक अन् एआयमुळे वाद

कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही डीपफेक (Deepfake) व्हिडिओ समोर आल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत गांभीर्याने पावलं उचलली आहेत. यातच काही दिवसांपूर्वी गुगलच्या जेमिनी (Gemini on PM Modi) या एआय टूलने पंतप्रधानांबाबतच्या एका प्रश्नाला आक्षेपार्ह उत्तर दिलं होतं. यानंतर आता सरकारने ही नवी अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT