Tech Layoffs April : 2024 या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. हाच ट्रेंड एप्रिल महिन्यात देखील कायम राहिला. एका रिपोर्टनुसार, वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये टॉप टेक कंपन्यांनी तब्बल 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या दरम्यान लेऑफचा ट्रेंड सुरू झाला होता. महामारी गेल्यानंतर जगभरातील अर्थव्यवस्था आता उभारी घेत आहेत. मात्र, असं असताना लेऑफचा ट्रेंड थांबलेला नाही. 2023 आणि आता 2024 मध्ये देखील कित्येक टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. (Tech Layoffs 2024)
मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अॅपलने एप्रिलमध्ये 614 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलं. कोरोना नंतरची ही सगळ्यात मोठी कपात होती. अॅपलच्या सेल्फ ड्रायव्हिंग कार प्रोजेक्टमधील हे कर्मचारी होते. हा प्रोजेक्टच गुंडाळल्यामुळे अॅपलने या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं. (Apple Layoffs)
दुसरीकडे गुगलने एप्रिल महिन्यात आपल्या कोअर टीममधील तब्बल 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच पायथन, फ्लटर आणि डार्ट या टीममधील कर्मचाऱ्यांना देखील गुगलने कामावरुन कमी केलं आहे. अर्थात, हे कर्मचारी कंपनीमध्येच दुसऱ्या पोझिशनसाठी अप्लाय करू शकतात असं गुगलने स्पष्ट केलं आहे. (Google Layoffs)
यासोबतच, अमेझॉन कंपनीने आपल्या क्लाउड कम्प्युटिंग डिव्हिजनमधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. तर इंटेलने कॅलिफोर्नियातील आपल्या मुख्यालयातील 62 कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. (Amazon Layoffs)
एडटेक कंपनी बायजूनेही सुमारे 500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलं होतं. इलॉन मस्कने टेस्ला कंपनीच्या कित्येक विभागांमधील कर्मचाऱ्यांची कपात गेल्या वर्षीपासूनच सुरू केली होती. हा पॅटर्न एप्रिल महिन्यात देखील सुरू राहिला. ओला कॅब्सने आपले सुमारे 10 टक्के कर्मचारी कमी केले होते. तसंच व्हर्लपूल कंपनीने देखील जगभरातील कार्यालयांमधून सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.