पुणे : आयफोन वापरणाऱ्यांसाठी त्याची बॅटरी डोकेदुखी ठरते. आयफोनला क्वालिटी आहे. पण, त्याची बॅटरी काही काळाने धोका देते. त्यामुळे लवकरच ती बदलण्याची वेळ येते.ॲपल स्टोर मधून बॅटरी बदलली तर ती 5500 रूपयेला पडते.
आपण कोणताही विचार न करता पैसे देऊन बसतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही 5,500 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
काही वर्षांपूर्वी एका युजरने दावा केला होता की, IOS अपडेटमुळे आयफोनचा बॅटरी बॅकअप कमी झाला आहे. यानंतर ॲपलने मोठा निर्णय घेतला होता.
यानंतर कंपनीने प्रत्येक आयफोनमध्ये बॅटरी हेल्थचा पर्याय दिला. याच्या मदतीने तुम्ही फोनच्या बॅटरीची माहिती मिळवू शकता. कंपनीने सुचवले आहे की, बॅटरी हेल्थ 85% पर्यंत असेल तर ती बदलली पाहिजे.
तुम्हालाही आयफोनमध्ये बॅटरी बॅकअपची समस्या भेडसावत असेल. आयफोनची बॅटरी खराब झाली आहे. तर तुम्ही ती सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यापूर्वी एकदा स्वत: तपासून पहा.बॅटरी तपासण्यासाठी, सेटिंग्जमध्ये जा. तुम्हाला बॅटरीचा पर्याय दिसेल. त्यात गेल्यानंतर तुम्हाला बॅटरी हेल्थमध्ये जावे लागेल.
बॅटरी हेल्थमध्ये गेल्यावर तुमच्यासमोर डेटा ओपन होईल. यामध्ये तुम्ही तुमच्या आयफोनची बॅटरी हेल्थ पाहू शकता.बॅटरी हेल्थ पाहिल्यानंतर, तुम्हाला बॅटरी बदलायची आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता.या सोप्या स्टेप्सनी तुम्ही घरी बसून आयफोनच्या बॅटरीबद्दल माहिती मिळवू शकाल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.