Smart Toothbrush Hacked eSakal
विज्ञान-तंत्र

Smart Toothbrush Hacked : 'स्मार्ट टूथब्रश'देखील होऊ शकतात हॅक? व्हायरल बातमीमधील दाव्यात किती आहे तथ्य?

Fact Check : व्हायरल होत असलेल्या बातमीत असा उल्लेख आहे, की एका स्विस फर्मने DDoS Attack च्या मदतीने 30 लाख इलेक्ट्रिक टूथब्रश हॅक केले आहेत.

Sudesh

30 Lakh Smart Toothbrush Hacked : सध्या इंटरनेटवर बऱ्याच ठिकाणी एक बातमी पहायला मिळत आहे. जगभरातील 30 लाख स्मार्ट टूथब्रश हॅक झाल्याचं यात म्हटलं आहे. कित्येक सोशल मीडिया पोस्टवरही याबाबतचा उल्लेख आहे. मात्र, हे खरंच शक्य आहे का?

व्हायरल होत असलेल्या बातमीत असा उल्लेख आहे, की एका स्विस फर्मने DDoS Attack च्या मदतीने 30 लाख इलेक्ट्रिक टूथब्रश हॅक केले आहेत. यामुळे नागरिकांचा खासगी डेटा लीक होऊ शकतो, असंही काही बातम्यांमध्ये म्हटलं आहे. मात्र, असं काही शक्य नसल्याचं फोर्ब्सने आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. (Electric Toothbrush Hacked)

कशी झाली सुरुवात?

या व्हायरल होत असलेल्या स्टोरीची सुरुवात एका इंजिनिअरच्या कमेंटपासून झाली. स्विस सायबर सिक्युरिटी फर्म फोर्टिनेटमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीने हा दावा केला होता. फोर्ब्सने या व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. (Smart Toothbrush Viral News)

एका स्विस न्यूजपेपरने पहिल्यांदा हे वृत्त छापले होते. मात्र, यामध्ये इलेक्ट्रिक डिव्हाईसचा उल्लेख नव्हता. तसंच यामध्ये हल्ला करणारी संस्था, हल्ल्याचा उद्देश्य किंवा त्याचे परिणाम याचाही उल्लेख नव्हता. हे केवळ इंटरनेट सुरक्षेबाबत माहिती देणारं आर्टिकल होतं. मात्र सोशल मीडियावर याबाबत अधिक वाढवून लिहिलं गेलं, आणि कुठूनतरी यात इलेक्ट्रिक टूथब्रशचं नाव आलं.

टूथब्रश होऊ शकतो का हॅक?

30 लाख सोडा, एक इलेक्ट्रिक टूथब्रश देखील हॅक करणं टेक्निकली खूप अवघड आहे. बहुतांश स्मार्ट टूथब्रश हे ब्लूटूथ एनर्जीवर चालतात. वाय-फाय कनेक्शनच्या तुलनेत ही अतिशय कमकुवत असते. त्यामुळे अशा प्रकारच्या एनर्जीवर चालणारी उपकरणं हॅक करणं खूपच अवघड असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT