Whaatsaap  Sakal
विज्ञान-तंत्र

Technology Flash Back 2022 : नव्या व्हाट्सअ‍ॅप फिचर्सने गाजवले २०२२ वर्ष!

२०२२ मध्ये अनेक गोष्टी घडल्या काही लक्षात राहिल्या तर, काही विस्मरणात गेल्या.

सकाळ डिजिटल टीम

Technology Flash Back 2022 : सध्याचं वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २०२२ मध्ये अनेक गोष्टी घडल्या काही लक्षात राहिल्या तर, काही विस्मरणात गेल्या.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

यंदाच्या म्हणजेच २०२२ मध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. त्यापैकी एक म्हणजे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया पलॅटफॉर्म असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फिचर्स लॉन्च करण्यात आले. यामुळे यावरील चॅटिंगचा अनुभव सुधारण्याबरोबरच यूजर्सची सुरक्षाही वाढण्यास मदत झाली. आज आम्ही तुम्हाला २०२२ मध्ये व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Meta ने लाॉन्च केलेल्या फीचर्सबद्दल सांगणार आहोत.

व्हॉईस मेसेज फीचर

व्हॉइस मेसेजचा अनुभव अधिक चांगल्याप्रकारे सुधारण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅपमध्ये अनेक फिचर्स सादर केले. यामध्ये आउट ऑफ चॅट प्लेबॅक, रेकॉर्डिंग स्टॉप/रेझ्युम, वेव्हफॉर्म व्हिज्युअलायझेशन, रिमेंबर प्लेबॅक, फॉरवर्डेड मेसेजेसवर फास्ट प्लेबॅक आदींचा समावेश आहे.

कम्युनिटी फीचर

व्हॉट्सअ‍ॅपने या वर्षी व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी फीचरही आणले आहे. याच्या मदतीने तुम्ही अतिपरिचित क्षेत्र, शाळेतील पालक आणि कामाच्या ठिकाणी असे ग्रूप तयार करू शकता, ज्यामध्ये ग्रुप चॅट्स आयोजित करण्यासाठी एकाच ठिकाणी अनेक गट एकत्र जोडले जाऊ शकतात. याशिवाय, कंपनीने कम्युनिटी फीचरमध्ये इन-चॅट पोल, 32 लोकांसह व्हिडिओ कॉलिंग आणि ग्रुप लिमिट 1024 यूजर्सपर्यंत वाढवले ​​आहे.

व्ह्यू वन्स फीचर

यावर्षी व्हॉट्अ‍ॅपने व्ह्यू वन्स फीचरदेखील लॉन्च केले आहे. या फिचरमुळे पाठवलेला मेसेज एकदाच पाहता येतो. या फिचर अंतर्गत फोटो आणि व्हिडिओचा स्क्रीनशॉट कोणीही घेऊ शकत नाही.

अवतार फीचर

Whatsapp ने नुकतेच अवतार फीचर आउट केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स स्वतःचा अवतार तयार करू शकतात आणि त्यांचा प्रोफाईल पिक्चर म्हणून वापर करू शकतात.

मेसेज युवर सेल्फ

मेसेज युवर सेल्फ फीचर्सनेदेखील अनेकांना फायदा झाला आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस कंपनीने हे फिचर लॉन्च केले आहे. या फीचरमुळे यूजर्स स्वतःला मेसेज पाठवू शकतात. अति महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी यूजर्सना या फीचरची मदत होत आहे.

प्रायव्हसी फीचर्स

या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता लक्षात घेऊन अनेक फीचर्स सादर केले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे लीव्ह ग्रुप्स सायलेंटली. या फीचरच्या मदतीने यूजर्स कोणालाही न कळवता कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडू शकतात.

इमोजी रिअ‍ॅक्शन

2022 मध्ये WhatsApp ने यूजर्ससाठी इमोजी रिअ‍ॅक्शन देऊ शकत आहेत. या फीचरच्या मदतीने यूजर्स एखाद्या गोष्टीवर विविध इमोजींच्या माध्यमातून रिअ‍ॅक्शन देऊ शकत आहेत.

फाईल शेअरिंग

आता व्हॉट्सअ‍ॅपवर 2GB पर्यंतच्या फाइल्स शेअर करता येणार आहेत. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून केवळ 100MB पर्यंतच्या फाइल्स शेअर करू शकत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Assembly Election 2024 Result: मालेगाव मध्यने थंडीत फोडला घाम; जिल्ह्यातील 14 मतदारसंघांचे निकाल निर्धारित वेळेत

IND vs AUS 1st Test : OUCH! विराट कोहलीने खणखणीत Six मारला, चेंडू निवांत बसलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर आदळला, Video

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

दिग्दर्शक आदित्य धारबरोबर रणवीरने सुवर्णमंदिरात घेतलं दर्शन ; 'या' बिग बजेट प्रोजेक्टच्या शूटिंगला होणार सुरुवात

Sunil Shelke Won Maval: तो एक फोटो अन्... भाजप विरोधात तरी सुनील शेळके कसे निवडून आले? अजित पवारांनी सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT