Technology News esakal
विज्ञान-तंत्र

Technology News : गुगल आणि मेटाचे हजारो कर्मचारी काम न करता पगार घेत होते

2023 सुरू झाल्यापासून, बऱ्याच मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

Technology News : 2023 सुरू झाल्यापासून, बऱ्याच मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याची घोषणा करत आहेत. गुंतवणूकदार आणि उद्योजक कीथ राबोइस यांनी अलीकडेच दावा केलाय की मेटा (Meta) आणि गुगलने (Google) फेक वर्क करण्यासाठी आणि कंपनीच्या व्हॅनिटी मेट्रिकची पूर्तता करण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांची नियुक्त केली होती. या टेक उद्योजकाचं म्हणणं आहे की, गुगल आणि मेटामध्ये नियुक्त करण्यात आलेले हजारो कर्मचारी काहीच कामाचे नव्हते. शिवाय त्यांनी फेक वर्क केलं होतं.

कीथ राबोइस कोण आहेत?

आता तुम्हाला प्रश्न पडेल की किथ राबोइस कोण आहेत? तर कीथ राबोइस हे Rabois OpenStore चे मुख्य कार्यकारी असण्यासोबतच ते फाउंडर फंडाचे जनरल पार्टनर देखील आहेत. फिनटेक फर्मच्या माजी कर्मचार्‍यांनी स्थापन केलेल्या पेपल माफियाच्या सदस्यांपैकी ते एक आहेत.

राबोईस म्हणतात की मोठ्या टेक कंपन्या 'ओव्हर-हायरिंग' करत होत्या आणि आता त्याच कंपन्या खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. बिझनेस इनसाइडर इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, बँकिंग फर्म एव्हरकोरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कीथ राबोइस म्हणाले की, व्हॅनिटी मॅट्रिक्युलेशनसाठी नियुक्त केलेले कर्मचारी कंपनीत एकस्ट्रा म्हणून काम करत होते.

आता हे लोक प्रत्यक्षात काय काम करायचे हे समोर येत आहे. राबोइस म्हणाले की कंपन्यांनी व्हॅनिटी मेट्रिक्सपासून दूर जावे आणि नफा मेट्रिक्सवर लक्ष केंद्रित करावे. जेणेकरून कर्मचारी कपात करावी लागणार नाही आणि विनामूल्य रोख प्रवाहात मदत होईल.

Layoffs.fyi नुसार, गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये, 1 हजाराहून अधिक कंपन्यांनी 1 लाख 60 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते आणि या वर्षी आत्तापर्यंत 1 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT