Phone Safety Sakal
विज्ञान-तंत्र

Phone Safety: फोनमधील अ‍ॅप डिलिट केल्यानंतरही राहतो पर्सनल डेटा; सेफ्टीसाठी करा 'ही' सेटिंग

पुजा बोनकिले

Phone Safety: सध्या फोन आपल्या जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. खरेदी असो की खाद्यपदार्थांची ऑर्डर देणे असो आपण सर्व गोष्टींसाठी फोनचा वापर करतो. पण यासाठी आपल्याला ॲप ओपन करावे लागते. जे ॲप्स मोठ्या प्रमाणावर वापरतो ते आपली वैयक्तिक माहिती देखील जमा करतात, जी आपण पहिल्यांदा लॉग इन करताना दिलेली असते. असे काही ॲप्स आहेत जे डेटा डिलीट केल्यानंतरही सेव्ह करतात. जर तुम्हाला वैयक्तिक माहिती कोणत्याही ॲप्समध्ये नसावी असे वाटत असेल तर पुढील प्रमाणे स्टेप फॉलो करू शकता.

जेव्हा आपण फोनवर ॲप्स इंस्टॉल करतो, तेव्हा लोकेशन, सोशल मीडिया फाइल्स, कागदपत्रे इत्यादी अनेक गोष्टींचा अॅक्सेस घेतात. पण जेव्हा आपण ॲप्स डिलिट करतो तेव्हाही तो अॅक्सेस त्यांच्याकडे राहतो. अशावेळी तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. तुम्हाला कोणत्या ॲपमध्ये आवश्यक माहिती आहे हे तपासायचे असल्यास पुढील सेटिंग करू शकता.

पुढील स्टेप करा फॉलो

सर्वात पहिले सेटिंग अॅप ओपन करावे.

नंतर Google Services वर जावे.

मॅनेज अकाउंटवर किल्क करा आणि पुढे जा.

आता डेटा आणि प्रायव्हेसीवर क्लिक करा.

हिस्ट्री सेटिंगच्या खाली, वेब आणि ॲप अॅक्टेव्हिटी पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला त्या ॲप्सची संपूर्ण यादी दिसेल ज्यांना तुमच्या लोकेशनसह अनेक माहितींचा अॅक्सेस असेल.

ॲप आणि वेबसाइटची सर्व माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला कुठेही माहिती काढायची असेल, त्यावर क्लिक करा आणि ती डिलिट करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voting Registration: विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं 'हे' महत्वाचं आवाहन

Swara Bhaskar चे पती विधानसभा निवडणूक लढवणार? मुंबईतील 'या' मतदारसंघातून उमेदवारी मिळणार

Assembly Election 2024: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना टीव्हीवर जाहिरात द्यावी लागणार; आयोगाने सांगितला कठोर नियम

Assembly Elections 2024: महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक कधी? तुफान पाऊस, सणासुदीचे दिवस, आयोगाचे आस्ते कदम...

Dharmaveer 2 : धर्मवीर 2 ने घडवला इतिहास ; ठरला सगळ्यात जास्त ओपनिंग करणारा मराठी सिनेमा

SCROLL FOR NEXT