Telegram Channels Ads eSakal
विज्ञान-तंत्र

Telegram Channels Monetization : आता 'टेलिग्राम चॅनल' करुन देणार बक्कळ कमाई; तुम्हीही करू शकता सुरू..

Sudesh

Earn Money from Telegram Channels : व्हॉट्सअ‍ॅपसोबतच जगभरात प्रसिद्ध असणारं एक अ‍ॅप म्हणजे 'टेलिग्राम'. व्हॉट्सअ‍ॅपवर चॅनल्स येण्याच्या कितीतरी आधीच टेलिग्रामवर हे फीचर उपलब्ध करण्यात आलं होतं. आता या चॅनल्सच्या माध्यमातून टेलिग्राम यूजर्सना पैसे कमावण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे. कंपनीचे फाऊंडर-सीईओ पावेल डुरोव्ह (Pavel Durov) यांनी याबाबत माहिती दिली.

पावेल यांनी सांगितलं, की कंपनी लवकरच एक अ‍ॅड प्लॅटफॉर्म (Telegram Ad Platform) लाँच करणार आहे. पुढील महिन्यात हे प्लॅटफॉर्म लाँच झाल्यानंतर, टेलिग्राम चॅनल ओनर्सना आपला कंटेंट मॉनिटाईज करता येणार आहे. आपल्या चॅनलमध्ये जाहिराती दाखवून, त्याचं 50 टक्के प्रॉफिट चॅनलच्या मालकांना मिळणार आहे. (Telegram Channels Ads)

क्रिप्टोमध्ये मिळणार पैसे

टेलिग्राम चॅनलच्या मालकांना आपल्या मॉनिटाईज (Telegram Monetization) झालेल्या कंटेंटसाठी रिवॉर्ड्स मिळणार आहेत. हे रिवॉर्ड्स 'टॉनकॉईन'च्या स्वरुपात असतील. टॉन ब्लॉकचेनवर (TON Blockchain) असणाऱ्या एका क्रिप्टोकरन्सीचं हे नाव आहे. जाहिरातीच्या माध्यमातून टेलिग्रामला जे पैसे मिळतील, त्यातील निम्मे पैसे कंपनी चॅनलच्या मालकांना देणार आहे.

100 देशांमध्ये होणार सुरू

सध्या टेलिग्रामवर असणाऱ्या सर्व चॅनल्सवर मिळून महिन्याला तब्बल 1 ट्रिलियनहून अधिक व्ह्यूज जनरेट होतात. मात्र यापैकी केवळ 10 टक्के मॉनिटाईज करण्यात आलेले आहेत. हे टेलिग्राम अ‍ॅड्स प्रमोशन टूलच्या मदतीने करण्यात आलं आहे. मार्चमध्ये लाँच होणाऱ्या टेलिग्राम अ‍ॅड प्लॅटफॉर्ममुळे जवळपास 100 देशांमधील चॅनल मालकांना कमाईची संधी उपलब्ध होणार आहे.

रेव्हेन्यू शेअरिंगचा (Telegram Ads revenue sharing) क्रायटेरिया, मॉनिटायजेशनचे नियम इत्यादी गोष्टींची माहिती आपण लवकरच देणार असल्याचं पावेल यांनी सांगितलं. टॉन ब्लॉकचेनच्या वापराबाबत आपण ठाम असल्याचं ते म्हणाले. सोबतच, अ‍ॅड पेमेंट या जलद आणि सुरक्षित असतील याची हमीदेखील त्यांनी दिली.

टॉनची किंमत वाढली

दरम्यान, या घोषणेनंतर टॉन या क्रिप्टोकरन्सीमध्ये (TON Crypto) तेजी दिसत आहे. आधी एक TON कॉईन हा 2.65 डॉलर्स किंमतीचा होता. यानंतर त्यामध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ होऊन तो 2.92 डॉलर्सवर पोहोचला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT