Tesla Cybertruck Sakal
विज्ञान-तंत्र

Tesla Cybertruck: कन्फर्म! भारतीय रस्त्यांवर दिसणार टेस्लाचा सायबरट्रक, ८००Km रेंज अन् बरचं काही

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाच्या गाड्यांची जगभरात चर्चा होते. लवकरच कंपनीचा सायबरट्रक भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Tesla Cybertruck Launch Soon: इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाच्या गाड्यांची जगभरात चर्चा होते. कंपनीचा इलेक्ट्रिक पिकअप सायबरट्रक लाँचआधीच विशेष चर्चेत आहे. टेस्लाने या सायबरट्रकचे वेगवेगळे प्रोटोटाइप मॉडेल सादर केले आहेत. मात्र, लवकरच टेस्लाचा हा सायबर ट्रक रस्त्यावर धावताना पाहायला मिळू शकतो. एवढेच नाही तर पुढील २-३ वर्षात या गाडीची भारतीय बाजारात देखील एंट्री होऊ शकते. वर्ष २०२५ पर्यंत टेस्लाचा सायबरट्रक भारतीय रस्त्यांवर पाहायला मिळू शकतो.

कंपनीने या सायबरट्रकचे ३ वेगवेगळे व्हेरिएंट्स आतापर्यंत सादर केले आहेत. आकाराने लहान मात्र पॉवरफुल मोटर, हटके डिझाइन, शानदार बॅटरी रेंज आणि दमदार फीचर्समुळे सायबरट्रकची नेहमीच चर्चा होते.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

स्पीड आणि बॅटरी रेंजमध्ये जबरदस्त आहे सायबरट्रक

टेस्ला सायबरट्रकच्या पॉवरट्रेन आणि स्पीडबद्दल सांगायचे तर लाइफस्टाइल पिकअप ट्रकला ३ प्रकारच्या मोटर पर्यायासह सादर केले जाऊ शकते. याच्या सिंगल मोटर आरडब्ल्यूडीची बॅटरी रेंज ४०० किमीपेक्षा अधिक असू शकते. सायबरट्रक अवघ्या ६.५ सेकंदात ताशी ० ते १०० किमीचा वेग पकडू शकतो.

ड्यूल मोटर एडब्ल्यूडी व्हेरिएंटची बॅटरी रेंज ४८० किमीपेक्षा अधिक असेल. हे व्हेरिएंट अवघ्या ४.५ सेकंदात ताशी ० ते ६० किमी वेग पकडू शकते. टेस्ला सायबर ट्रकचे ट्राय मोटर एडब्ल्यूडी व्हेरिएंटची बॅटरी रेंज ८०० किमीपेक्षा जास्त असेल. हे व्हेरिएंट अवघ्या २.९ सेकंदात ताशी ० ते १०० किमीचा वेग पकडते.

लुक आणि फीचर्स

अपकमिंग टेस्ला सायबरट्रक लूक आणि फीचर्सच्या बाबतीतही जबरदस्त आहे. या इलेक्ट्रिक पिकअप ट्रकचे डिझाइन इतर सर्व ईव्हींच्या तुलनेत खूपच वेगळे आणि फ्यूचरिस्टिक आहे. ट्रक ३०X कोल्ड-रोल्ड स्टेनलेस स्टीलने बनलेला आहे. विशेष म्हणजे ९एमएम राउंडच्या बुलेटने फायरिंग झाले तरीही ट्रकला काहीही होणार नाही, असे सांगितले जाते.

६.५ इंच मीटरची लांबी असलेल्या या सायबर ट्रकमध्ये २८०० लीटरपर्यंत स्टोरेज स्पेस आहे. ट्रकमध्ये ऑटोपायलट, फुल सेल्फ ड्राइव्हिंग आणि लेटेस्ट कनेक्टिव्हिटी सारखे शानदार फीचर्स देखील पाहायला मिळतील. या ट्रकमध्ये मिळणारे फीचर्स आतापर्यंत कोणत्याच कारमध्ये पाहायला मिळालेले नाहीत. या ट्रकचे वैशिष्ट्ये म्हणजे टेस्ला सायबरट्रकच्या मागील बाजूला बेडमध्ये देखील बदलू शकता. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार यात बदल करता येईल.

हेही वाचा: Ruturaj Gaikwad: सिक्सर किंग ऋतुराजने खरेदी केली Jawa ची भन्नाट बाईक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT