Tesla Issues Major Recall for 1.8 Million Vehicles Due to Software Glitch esakal
विज्ञान-तंत्र

Tesla Car Recall : टेस्लाच्या इतिहासातली सर्वात मोठी रिकॉल मोहीम! तब्बल 18 लाख गाड्यांना परत बोलवण्यामागचं कारण काय?

Tesla Global Recall : टेस्लाने आपल्या 18 लाख गाड्यांना परत बोलावले आहे. या कंपनीच्या इतिहासात ही आजवरची सर्वात मोठी कार रिकॉल सर्वात मोठी रिकॉल मोहीम आहे.

Saisimran Ghashi

Tesla Car Problem : अमेरिकेतील सर्वात मोठी कार कंपन्यांपैकी एक असलेल्या टेस्लाने आपल्या 18 लाख गाड्यांना परत बोलावले आहे. या गाड्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बिघाड असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

याबाबतची माहिती नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने दिली आहे. या कंपनीच्या इतिहासात ही आजवरची सर्वात मोठी कार रिकॉल म्हणून आहे.

या गाड्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये अशी त्रुटी आहे की, त्यातून कारची हुड उघडली असताना ती ओळखू शकत नाही. त्यामुळे चालकाच्या दृष्टीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते.

या रिकॉलचा परिणाम 2021 ते 2024 मॉडेल 3, मॉडेल एस आणि मॉडेल एक्स तसेच 2020 ते 2024 मॉडेल वाय या कारवर होणार आहे. एकूण 18 लाख 49 हजार 648 गाड्या या रिकॉलच्या कक्षेत येत आहेत.

Tesla Company Recalls 1.8 Vehicles

याबाबतचा दिलासा म्हणजे टेस्लाने या समस्याचे निराकरण सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून केले आहे. कंपनीने यासाठी अपडेट देणे सुरू केले आहे. याच प्रकारची एक छोटीशी समस्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला आढळून आली होती, त्याचेही निराकरण करण्यात आले होते.

टेस्लाच्या कारच्या रिकॉलची यादी वाढतच चालली आहे. यातील बहुतेक समस्यांवर सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून उपाय केला जात असला तरी काही प्रसंगी नुकत्याच झालेल्या सायबर ट्रकच्या विंडशील्ड वाइपरच्या समस्येसाठी कार सर्विस सेंटरला नेण्याची गरज पडू शकते.

या नव्याने जाहीर झालेल्या रिकॉलचा परिणाम टेस्लाच्या बहुतांश कारवर होणार आहे. मात्र, गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या रिकॉलच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. त्यावेळी 20 लाखांहून अधिक टेस्ला गाड्यांना रिकॉल करण्यात आले होते. टेस्लाने त्यांच्या वेबसाइटवर याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सुझुकी इंडियाने देखील तांत्रिक त्रुटीमुळे जवळपास ४ लाख स्कूटी आणि मोटारसायकल्स परत बोलावल्या होत्या. यामध्ये लोकप्रिय स्कूटी Access 125, Burgman Street 125 आणि Avenis 125 सोबत नुकतीच लाँच झालेली V-Strom 800 DE ही महागडी ॲडवेंचर बाइक यांचा देखील समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT