kids tv 
विज्ञान-तंत्र

Kids showsचा मागणी वाढली! स्ट्रीमिंग कंपन्या मुलांसाठी कंटेंट तयार करण्यावर देताहेत भर

मुले त्यांचे कार्यक्रम प्रौढांपेक्षा जास्त काळ पाहतात

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दोन वर्षातला कोरोना काळ हा मुलं (Children) आणि अल्पवयीन मुलांच्या (Teenagers) पालकांना अत्यंत जड गेला आहे. शाळा (School) बंद असल्याने मुलांवर लक्ष ठेवायचं कि आपल्या कामावर असा प्रश्न पालकांना (Parents) पडला. सोशल मीडिया(Social Media), चित्रपट आणि व्हिडिओमुळे त्यांचा जरा वेळ गेला. दैनिक वृत्तपत्राने द इकॉनॉमिस्टच्या हवाल्याने वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, डेटा फर्म पॅरोट अॅनालिटिक्सच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की यूएस मध्ये 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंत, चित्रपट शोधण्याची साइट आयएमबीडी( IMDb ) वर मुलांच्या शोची मागणी 6० टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत इतर शैलीतील चित्रपट, व्हिडीओजची मागणी २३ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे सोशल मीडिया कंटेंटबाबत पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Streaming Companies Now Focus On Kids Shows)

प्यू रिसर्च सेंटर च्या ताज्या अहवालानुसार तरूणांत (Young) लोकप्रिय असणाऱ्या युट्यूबवरचा कंटेट मुलांसाठी (Kids)फारसा चांगला नाही, असे जवळपास अर्ध्या पालकांचे (Parents) म्हणणे आहे, टिकटॉकसाऱख्या अॅपमुळे नुकसान होते, असेही मानले जाते. त्यामुळे आगामी काळात पालक मुलांना आक्षेपार्ह मजकुरापासून दूर ठेवू शकतात. अनेक स्ट्रीमिंग कंपन्यांनी मुलांवर लक्ष केंद्रित करून चित्रपट आणि कार्यक्रम बनवण्याची तयारी केली आहे. केवळ मोठ्या कंपन्याच नाही तर छोट्या कंपन्यांनीही या क्षेत्रात प्रगती केली आहे. महामारीच्या काळात लहान मुलांच्या कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या किड्डूल टिव्ही (kidoodle tv) चा डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. डिज्नेचे (Disney) दोन माजी अधिकारी कोकोमेलॉन (Cocomelon) आणि ब्लिपी (Blippi) सारखे प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम तयार करणारी कंपनी मूगबन एंटरटेनमेंट (Moonbug Entertainment) ही खरेदी करण्यासाठी 22 हजार कोटी रूपये मोजायला तयार आहे. (Streaming Companies Now Focus On Kids Shows)

लहान मुलांच्या शोमुळे अधिक फायदा

ऑकलंड युनिव्हर्सिटी (Auckland University)च्या एरिन मेयर्स म्हणतात की अनेक कारणांमुळे स्ट्रीमिंग कंपन्यांचा कल मुलांसाठी आणि अल्पवयीन मुलांसाठीच्या कार्यक्रमांकडे वाढला आहे. लहान मुलांचे टीव्ही शो, विशेषत: अॅनिमेटेड चित्रपट, प्रौढांच्या कार्यक्रमांच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्याच्या लोकप्रियतेचा काळही मोठा आहे, कारण मुले त्यांचे कार्यक्रम प्रौढांपेक्षा जास्त काळ पाहतात. मुलांच्या कार्यक्रमांशी संबंधित इतर व्यावसायिक फायदे आहेत. कार्यक्रमांच्या नावाखाली मुलांची खेळणी, कपडे, खेळ विकले जातात.(Streaming Companies Now Focus On Kids Shows)

कंपन्या मुलांसाठी देत आहेत असा कंटेट

डिज्ने (Disney)

डिज्ने, मुलांच्या आवडत्या ब्रॅंडपैकी आहे. मुलांसाठी त्यांनी एक नवीन योजना घेऊन आली आहे. पॅरामाउंट प्लस त्याच्या निकेलोडियन कार्यक्रमांचा पालकांमध्ये प्रचार करत आहे.

वॉयकॉम (Viacom)

वॉयकॉम (Viacom) सीबीएस-एल्विन एंड चिपमंक्स शो (CBS-Alvin and Chipmunks show) 2200 कोटींना विकत घेण्यासाठी निर्मात्यांशी चर्चा करत आहे. तर, तरूणांसाठी मसालेदार, थरारक शो बनवणाऱ्या एचबीओ मॅक्सने लहान मुलांवर केंद्रित असलेले कार्टूनिटो हे पोर्टल सुरू केले आहे.

नेटफ्लिक्स (Netflix)

नेटफ्लिक्सने सप्टेंबरमध्ये लोकप्रिय लेखकाच्या कथेचे हक्क विकत घेण्यासाठी रॉल्ड डहल स्टोरी कंपनीला पाच हजार कोटींपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. रोनाल्ड डहलने चार्ली आणि चॉकलेट फॅक्टरी सारख्या प्रसिद्ध कथा लिहिल्या आहेत. कंपनीने नोव्हेंबरमध्ये लहान मुलांच्या कार्यक्रमांवर लहान व्हिडिओ शो किड्स क्लिप लॉन्च केला. (Streaming Companies Now Focus On Kids Shows)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT