Worlds First Flying Bike: टेक्नोलॉजीमुळे अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. काल परवा पर्यंत रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या आता लवकरच आकाशात उडताना दिसणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून फ्लाइंग बाईकची चर्चा सुरू आहे.
मात्र, आता प्रत्यक्षात या बाईकचे बुकिंग सुरू झाला आहे. अमेरिकन अॅव्हिएशन कंपनी जॅटपॅकने या फ्लाइंग बाईकचे बुकिंग सुरू केले आहे. या बाईकमध्ये ८ जेट इंजिनचा वापर करण्यात आला आहे. अवघ्या ३० मिनिटात ही बाईक ९६ किमी अंतर पार करू शकते. या बाईकविषयी सविस्तर जाणून घेऊया.
फ्लाइंग बाईकचे डिझाइन
.या बाईकमध्ये चार जेट इंजिनचा वापर करण्यात आला होता. मात्र, अंतिम डिझाइनमध्ये याची संख्या ८ करण्यात आली आहे. बाईकच्या चारही कोपऱ्यांवर दोन-दोन जेट इंजिन आहेत. यामुळे बाईक चालवताना कोणतीही समस्या येणार नाही. बाईक सहज २५० किलो वजन वाहून नेऊ शकते.
बाईकची टॉप स्पीड
हवेत उडणाऱ्या जगातील पहिल्या बाईकचा टॉप स्पीड ताशी ४०० किमी आहे. मात्र, या स्पीडने हवेत उडणे सोपे नाही. कंपनीचा दावा आहे की, शिकलेला पायलेट या बाईकला १६ हजार फूट उंचीवर सहज उडवू शकतो.
हवेत इंधन संपल्यास?
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हवेत इंधन संपल्यास? अशा स्थितीमध्ये पायलटला सुरक्षित जमीनवर परत आणण्यासाठी पॅराशूटची गरज असते.मात्र, अद्याप याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.
या टेक्नोलॉजीचा होणार वापर
फ्लाइंड बाईकमध्ये फ्लाय-बाय-वायर टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल. हँडग्रिपमध्ये देण्यात आलेल्या बटनाद्वारे याला कंट्रोल केले जाईल. एक बटन टेक ऑफ आणि लँडसाठी, तर दुसरे बटन स्पीड कंट्रोल करण्यासाठी असेल.
उडताना अडथळा आला तर?
पायलटच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाईकमध्ये कंट्रोलिंग यूनिट सेंसरचा वापर करण्यात आला आहे. प्रवासादरम्यान इमारत, झाड अथवा इतर अडथळा आल्यास अशा स्थितीमध्ये ऑटोमेटिक सिस्टम टक्कर होण्यापासून वाचवेल.
किती असेल बाईकची किंमत
या बाईकचे निर्मिती जेटपॅक अॅव्हिएशन कंपनी करत आहे. फ्लाइंग बाईकचे बुकिंग सुरू झाले असून, याची सुरुवाती किंमत ३.१५ कोटी रुपये आहे. ही हटके बाईक पुढील २ ते ३ वर्षात बाजारात येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.