सध्या ‘अन्न, वस्त्र, निवारा’ याबरोबरच अजून एक गोष्ट या काळात जीवनावश्यक बनली आहे, आणि ती म्हणजे मोबाईल फोन! तो पण साधासुधा नाही तर, ‘स्मार्टफोन’. गेल्या काही वर्षांपासून कोरोनामुळे मुलांच्या शाळा, कॉलेजच्या परीक्षा आणि मोठ्यांचं ऑफिसचं काम सगळंच या फोनवर सुरु झालंय. त्यात म्हणजे फोटोग्राफी लव्हर्सना तर स्मार्टफोनशिवाय गत्यंतर नाही. पण अनेकांना महागड्या स्मार्टफोनचे बजेट खिशाला परवडणारे नसते. त्यामुळं काय करावं कोणता स्मार्टफोन घ्यावा असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. (The price of this Google Pixel 8 has dropped on flipkart check )
पण तुम्हाला आता जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण गुगलच्या Pixel 8 वर खूप मोठी सूट दिली जात आहे. या फोनवर डिस्काउंट व्यतिरिक्त बँक ऑफर देखील दिल्या जात आहेत, ज्याद्वारे ग्राहकांना फोनवर अतिरिक्त सूट मिळू शकते. यासोबतच ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेता येणार आहे.
सर्वांच आवडत ऑनलाईन शॉपिंग अॅप फ्लिपकार्टवर हा मोबाईल उपलब्ध आहे. गुगलचे हे फ्लॅगशिप डिव्हाइस सध्या या साइटवर ६१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटसाठी आहे.
Pixel 8 भारतात 75,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, याचा अर्थ ग्राहकांना येथे 14,000 रुपयांची सवलत मिळत आहे. आयसीसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 4,000 रुपयांची सूट देखील देण्यात आली आहे, ज्यामुळे Pixel 8 ची किंमत प्रभावीपणे 57,999 रुपयांपर्यंत खाली येईल.
ज्या ग्राहकांना त्यांचा जुना फोन विकायचा आहे ते डिव्हाइसवर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात. फ्लिपकार्ट एक्स्चेंजवर 54,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, परंतु लक्षात ठेवा की प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त सवलत मिळविण्यासाठी ग्राहकांना चांगल्या स्थितीतील फोन प्रदान करावा लागेल. योग्य किंमतीसाठी, आपल्याला साइटवर मॉडेल प्रविष्ट करून ते तपासावे लागेल.
Pixel 8 ची काय आहे खासीयत
ज्यांना कॉम्पॅक्ट आणि क्लिन अँड्रॉईड फोन हवा आहे त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन अधिक उपयुक्त आहे. तसेच ज्यांना स्मार्टफोन फोटोग्राफी आवडते त्यांच्यासाठी खुप फायद्याचा आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.2-इंचाचा OLED डिस्प्ले, Tensor G3 प्रोसेसर, 50MP + 12MP रियर कॅमेरा सेटअप, 10.5MP फ्रंट कॅमेरा आणि 4575mAh बॅटरी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.