Satyendra Nath Bose esakal
विज्ञान-तंत्र

'बोसॉन'चे जनक सत्येंद्रनाथ बोस यांची कहाणी

आज सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्मदिन. विनम्र अभिवादन.

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

आज सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्मदिन. विनम्र अभिवादन.

गोष्ट तेव्हाचीयं जेव्हा तो ‘एमएससी’ (MSC)करत होता. गणिताच्या एका परिक्षेत आशुतोष मुखर्जी नामक एका प्राध्यापकाने एक भयंकर कठिण प्रश्न विचारला ज्याचे उत्तर एकही विद्यार्थ्याला आलं नाही. “एवढं जीव काढून शिकवलं तरी एकालाही उत्तर येऊ नये?”प्राध्यापक महोदय अंमळ नाराज झाले.

एके दिवशी न राहावून त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं,”वर्गात काय शिकवलं जातं? तुम्ही शिकता काय? परिक्षेत लिहिता काय? काहीच ताळमेळ नाही. एका साध्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येईना. मोठी शरमेची बाबयं.” आशुतोष मुखर्जी केवळ प्राध्यापक नव्हते तर ते कुलगुरू आणि सोबतच ‘गणित’ या विषयाचे हाडाचे शिक्षकही होते. त्यांना उलट उत्तर देणं येरागबाळ्याचं काम नव्हतं. सगळ्यांनी खाली माना घालून त्यांचे म्हणणं कम बोलणं ऐकून घेतलं. तेवढ्यात ‘तो’ उभा राहिला.” सर, जर प्रश्नच चुकीचा असेल तर त्याला सोडवावं तरी कसं?” त्याच्या तोंडून अनपेक्षित असा प्रश्न वर्गात गुंजला आणि सगळे चिडीचूपच झाले. प्रा.मुखर्जींना आव्हान देणं साधीशी बाब खचितच नव्हती.

मुखर्जींनी संयमी स्वरात त्याला विचारलं,”प्रश्न चुकीचाये असं तु कसं म्हणू शकतोस?” “मला तो प्रश्न आठवतोय, तुम्ही सांगाल तर आता त्यात काय चुकलं होतं ते मी सांगू शकतो” असं म्हणत त्यानं तो प्रश्न कसा चुकलाय हे सप्रमाण सिद्ध केलं. प्राध्यापक महोदयांनी त्याची पाठ थोपटतच त्याच्या प्रतिभेची प्रशंसा केली. त्या विद्यार्थ्याचं नाव होतं सत्येंद्रनाथ बोस (Satyendra Nath Bose). तुम्ही बोस-आईनस्टाईन तंत्र, बोस-आईन्स्टाईन कंडेन्सेट बोसॉन पार्टिकल यांच्याबद्दल कधीतरी वाचलं असेलच किंवा भौतिकशास्त्रात रस असलेल्या मंडळींना ही नावं चिरपरिचित असतीलच. यातील ‘बोस’ म्हणजेच हा विद्यार्थी सत्येंद्रनाथ.

विज्ञानविश्वात ‘सत्येंद्रनाथ बोस’ या नावाचं आजही एक वेगळंच स्थान आहे. १८९४ ला एका मध्यमवर्गीय बंगाली कुटूंबात जन्मलेल्या सत्येंद्रनाथाचे बाबा भारतीय रेल्वेतल्या अभियांत्रिकी विभागात लेखापाल होते. तत्कालिन परिस्थितीत सत्येंद्रनाथाच्या डोक्यातही स्वातंत्र्य चळवळीचं वारं शिरलं होतं. दरम्यानच्या काळात लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केली, तेव्हा सत्येंद्र इनमिन अकरा वर्षांचा होता. कोलकातास्थित हिंदू शाळेत शालेय शिक्षण (School education) पुर्ण केल्यानंतर तो प्रेसिडेन्सी महाविद्यालयात दाखल झाला आणि विज्ञानात पदवी घेत १९१५ उजाडेपर्यंत त्यानं मिश्रगणित या विषयात पद्व्युत्तर शिक्षण (Education) घेतलं, दोन्हीही वेळेला फर्स्ट क्लास फर्स्ट.

आपलं औपचारिक शिक्षण पार पडल्यानंतर तो कोलकात्यात नुकतंच स्थापित झालेल्या ‘युनिवर्सिटी ऑफ सायन्स’ इथं रिसर्च स्कॉलर म्हणून रुजू होत इथं त्यानं इतर विषयांसोबतच सापेक्षतावादाच्या सिद्धांताचाही साकल्यानं अभ्यास केला. हा काळ भौतिकशास्राचा विकास होण्याचा होता. पाश्चात्य देशात ’क्वांटम फिजिक्स’ (Quantum Physics) हा शब्द एव्हाना परवलीचा झाला होता आणि तत्संबंधित अनेक परिणाम सिद्ध होत होते. रिसर्च स्कॉलर (Research Scholar) आणि लेक्चरर (Lecturer) म्हणूव काम करतांना सत्येंद्रनाथाचे सहकारी मेघनाद सहा, एन.आर धर, प्रशांतचंद्र महालनोबिस असे एक से एक दिग्गज होते.

हा काळ विज्ञानविश्वासाठी विकसनशील असला तरी आव्हानात्मकही होता. कारण पहिलं महायुद्धाचं रणशिंग फुंकलं गेल्यामुळे भारतीय ग्रंथालयं (Indian Libraries) ओस पडली होती, कारण पश्चिमेकडून नविन पुस्तकं येणं बंद झाले होतं. भौतिकशास्त्रातले शोधनिबंध हे बहुतांशी फ्रेंच किंवा जर्मन भाषेत लिहिलेली असत. त्यामुळे निमित्त न शोधता ही बाधा रोखण्यासाठी सत्येंद्रनाथ थेट या भाषा शिकले. या सगळ्याचा परिपाक म्हणून १९२० ला त्यांनी साहांसोबत ‘द प्रिन्सिपल ऑफ रिलेटिविटी’ नामक एक पुस्तक प्रकाशित केलं जो तत्कालिन जर्मन-फ्रेंच मांडणीचा जगातील पहिला इंग्रजी अनुवाद होता. यानंतर पुढच्याच वर्षी सत्येंद्रनाथ ढाक्याच्या भौतिकशास्त्र विभागात ‘रिडर’ म्हणून रुजू झाले आणि सोबतच एक प्रकल्पही हाती घेतला जो नंतर विज्ञानविश्वात अत्यंत महत्वाचा ठरला.

त्यांनी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लांकच्या 'क्वांटम रेडिएशन नियमाची उकल पारंपरिक भौतिकशास्त्राच्या मदतीशिवाय केली. १९२४ ला जून महिन्यात सत्येंद्रनाथांनी थेट आईन्स्टाईनला एक पत्र पाठवले. ज्यात अनेक अगदी नविन डेरिव्हेटिव लिहून पाठवले होते. सत्येंद्रनाथांनी या पत्रात लिहिलं होतं,” तसं तर मी तुमच्यासाठी अपरिचित असलो तरीही माझे डेरिव्हेटिव आपण प्रकाशित करावे असं सांगतांना मला बिल्कूल संकोच वाटत नाही कारण मी तुमचाच विद्यार्थी आहे. मी फक्त वाचून आपल्या अध्यापनाचा लाभ घेतलाय. मला ठाऊक नाही तुम्हाला आठवत असेल की नाही पण कोलकात्याहुन कुणीतरी तुमच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा अनुवाद करण्याची परवानगी मागितली आणि तुम्ही ती दिली तो अनुवादक मीच.” आता वेळ उलटी होती आईन्स्टाईननं सत्येंद्रनाथाची मांडणी केवळ जर्मनीत अनुवादित केली असं नाही पण प्रकाशित करत शेवटी तळटिपही लिहिली,”

“प्लांकच्या फॉर्मुल्यावर बोसचे डेरिव्हेशन्स हे माझ्या मते विज्ञानाला पुढं नेणारं महत्वाचं पाऊल आहे.” सत्येंद्रनाथांनी प्लांकच्या नियमाला जे डेरिव्हेशन्स दिली होती त्यावरूनच ‘बोस-आईनस्टाईन’ स्टॅटिस्टिक समोर आलं आणि ‘क्वांटम मॅकेनिक्स’चा महत्वपुर्ण भाग बनलं. आईनस्टाईनसोबतच्या या पत्रव्यवहारामुळे सत्येंद्रनाथांसाठी युरोपाचे दरवाजे खुले झाले आणि त्यांची बर्लिन इथं थेट आईन्स्टाईनशी ऐतिहासिक भेटही झाली. सोबतच पॉल लंगविन आणि मॅडम क्यूरी हे दिग्गजही भेटले.

सत्येंद्रनाथांना फ्रान्सच्या सुप्रसिद्ध लॅबमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी एक्सरे-स्पेक्ट्रोस्कोपी-क्रिस्टलोग्राफी यावर बहुमोल काम करत या संधीचं सोनं केलं. १९२६ ला सत्येंद्रनाथ मायदेशी परतले आणि तत्कालिन नियमानुसार ‘डॉक्टरेट’ नसतांनाही थेट आईन्स्टाईनला भिडल्यामुळे त्यांना ढाका विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागाचं प्रमुख पद देण्यात आलं. ढाका विद्यापीठाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सत्येंद्रनाथांनी सार्थ ठरवला. त्यांनी “डी2 स्टॅटिस्टिक्स-टोटल रिफ्लेक्शन ऑफ इल्क्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह्स इन द आयनोस्फीअर ऑन लोरेंट्झ गृप ऑन ॲन इंटीग्रल इक्वेशन ऑफ हायड्रोजन ॲटम प्राब्लेम” या जटिल विषयांवर मुलभूत असं लिखाण केलं.

१९४५ उजाडलं तसं ‘भारताचं स्वातंत्र्य आणि अटळ अशी फाळणी’यांची चाहूल लागली तेव्हा सत्येंद्रनाथ कोलकात्यात परतले आणि कोलकाता विद्यापीठात रुजू होत त्यांनी तिथं आजन्म सेवा दिली. भौतिकशास्रात जागतिक पातळीवर काम करणारे सत्येंद्रनाथ व्यक्तिश: बहुभाषिक असले तरी शालेय शिक्षण मातृभाषेतच असावं या मताचे होते. हा अनुभव त्यांना जपानमध्ये आला होता, त्यांनी तिथं जपानी शिक्षकांना अत्यंत क्लिष्ट संकल्पना मातृभाषेत सहज समजावून सांगतांना बघितलं होतं. यासाठी त्यांनी आधी केलं मग सांगितलं. त्यांनी अनेकविध वैज्ञानिक कार्यांना बंगालीत अनुवादित केलं. सोबतच विज्ञानाला स्थानिक भाषेत रुजवण्यासाठी ‘बंगिया विज्ञान परिषद’ या समितीची स्थापनाही केली.

भौतिकशास्त्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना नोबेलसाठी अनेकदा नामांकन मिळालं, पण प्रत्येक वेळी नोबेलनं त्यांना हुलकावणी दिली. “कुठला पुरस्कार नव्हे तर माझं काम हिच माझी ओळख आहे” हे वाक्य ते नेहमी म्हणत. हे तंतोतंत खरं ठरलं जेव्हा बोस-आईन्स्टाईन सांख्यिकीतल्या त्यांच्या योगदानासाठी मुलभूत कणांना ‘बोसॉन’ असं नाव देण्यात आलं. सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील ‘क्वांटम मेकॅनिक्स’ या क्षेत्रात बोस यांचं विशेष योगदान आहे ज्यासाठी त्यांना पद्मविभूषणनं गौरवण्यात आलं आणि ते 'फेलो ऑफ द रॉयल सोसायटी’ही होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT