scientist albert calmette esakal
विज्ञान-तंत्र

बाबा, येणारा काळ माझाच असेल! 'अल्बर्ट'चे शब्द ठरले खरे

स्वप्न-काम-जिद्द-कर्तव्य-यश यांच्या नव्या व्याख्या जगाला शिकवणाऱ्या या महामानवाचा आज (ता.29 ऑक्टोबर) स्मृतीदिन आहे. यांना विनम्र अभिवादन.

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

स्वप्न-काम-जिद्द-कर्तव्य-यश यांच्या नव्या व्याख्या जगाला शिकवणाऱ्या या महामानवाचा आज (ता.29 ऑक्टोबर) स्मृतीदिन आहे. यांना विनम्र अभिवादन.

गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये कोविडनं जेव्हा जगभरात हातपाय पसरायला सुरूवात केली तेव्हा स्पेन-इटलीत प्रचंड हाहाःकार उडाला होता. तुलनात्मकदृष्ट्या भारताची लोकसंख्या बघता तेव्हा इथं बरीच शांतता होती. क्षयरोगासाठी भारतात राबवण्यात आलेला ‘बीसीजी’ लसीकरणाच्या कार्यक्रमामुळे या विषाणूला बरा रोगप्रतिकारक प्रतिसाद मिळाल्याने प्रारंभी ‘कोविड’ नियंत्रित राहिला असे निरीक्षण काही तज्ज्ञांनी मांडले. अर्थात आजही कोविड संदर्भातला एकुणच गोंधळ बघता मतमतांतर असतील म्हणून बीसीजीचं महत्त्व नाकारता येणार नाही. चला आज या बीसीजी मधल्याच ‘सी’ ची गोष्ट सांगतो. सी म्हणजे कॅल्मेट.

‘बॉड जेम्स बॉड’ तसं ‘कॅल्मेट अल्बर्ट कॅल्मेट’ इथं काही तरी शाब्दिक गोष्टी करायचे म्हणून जेम्स बॉंडचा उल्लेख आलाय असे नाही. पडद्यावर ‘आता आकाशात- मग समुद्रात लगेच पार्टीत’अशा करामती दाखवणाऱ्या जेम्स बॉंडप्रमाणेच अल्बर्ट कॅल्मेटनं वैद्यकशास्रात जगभर विहार केला. अनेक भूमिका निभावल्या-प्रचंड काम करून ठेवले. वयाच्या दुसऱ्या वर्षीच मातृछत्र हरपलेल्या अल्बर्टचं बालपण थोडं हलाखीतच चालले होते अन् दुसऱ्या बाजूला फ्रांस कुस बदलत होता. साहसकथा-शोधकथा वाचता वाचता त्याला शोधकार्य-टास्क यांच्यामधला रोमांच मनातल्या मनात अनुभव याची सवय लागली अन् वयाच्या तेराव्या वर्षी अल्बर्टनं आपल्याला ‘खलाशी’व्हायचंय हा इरादा पक्का केला.

पुढचं आयुष्य समुद्रावर घालवायचं असल्याने त्याने तशी तयारी केली पण दुर्देवान त्याचं व्यावसायिक प्रशिक्षण विषमज्वरामुळे लांबले आणि त्याचा तिथे प्रवेश रखडला. दरम्यान त्याची वयोमर्यादाही संपली. एवढ्या नकारात्मक परिस्थितीतही सगळी दार बंद झाली असताना त्याचे जग बघण्याचे स्वप्न अजूनही जिवंत होतं. अल्बर्टनं ‘नौदल’ वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश घेतला अन् दोन वर्षांनी त्याची फ्रेंच नौदलात ‘ट्रेनी डॉक्टर’ म्हणून त्याची नियुक्ती झाली. त्यानं त्याच्या बाबांना पत्र पाठवत त्यात लिहिले, “बाबा, येणारा काळ माझाच असेल” अल्बर्टनं चायना-व्हिएतनाम दौऱ्यात विजयाचा आस्वाद घेतलाच पण त्याचं अनुभवविश्वही समृद्ध झाले. या दरम्यान त्यानं अनेक नोंदी केल्या.

हॉंगकॉंगमध्ये त्याची स्कॉटिश डॉक्टर पॅट्रिक मॅन्सन याच्याशी गाठ पडली. पॅट्रिकनं ‘हत्तीपाय’ या रोगाबद्दल मुलभूत संशोधन केलं होतं. कॅल्मेटनं त्याच्या पुढं जाऊन या आजारातील वेगवेगळ्या टप्प्यांबद्दल निरीक्षणे मांडली. या काळात फ्रांस-चायना यांच्यातला युद्धज्वर प्रचंड वाढला, चर्चा फिस्कटल्या आणि दोघा देशात युद्धाचं रणशिंग फुंकले गेले. सैनिकांच्या शुश्रूषेपासून अल्बर्टनं थेट चकमकही बघितली. फ्रांसने चायनाचा एकेक प्रांत काबिज केला तद्पश्चात शांतीकरार झाला आणि अल्बर्टला फ्रांसहून पुनःश्च बोलवणं आले.

मायदेशी परतल्यानंतर त्यानं आपले उरलेलं वैद्यकिय शिक्षण पुर्ण केले. मॅन्सनच्या संशोधनातील त्याच्या निरीक्षणावर त्यानं प्रबंध लिहिला. बोलूनचालून अल्बर्ट वैद्यकशास्रातला ‘बॉंड’ त्यानं यानंतर थेट आफ्रिका गाठत काम केले-मित्र बनवले-संशोधनही केले. तिथले चमत्कारिक आजार अभ्यासणं-पेशंटला सर्व्हिस देणं यासाठी या कालावधीत अल्बर्टनं अक्षरश: डे-नाईट अशा दोन्ही शिफ्टमध्ये काम केले. एरवी इतर डॉक्टर फक्त आजारांचा इलाज करायचे अल्बर्टनं युरोपीयन देशांशी तुलना करत गरीबी-अस्वच्छता-शिक्षणाचा अभाव ही कारणं अंतर्भूत करत एका वेगळ्या दृष्टिकोनातून आजाराकडे बघितले. मुलभूत सुधारणा सुचवत अत्यंत प्रभावी असं काम केले.

तिथलं काम आटोपून मायदेशी परतल्यानंतर अल्बर्ट विवाहबद्ध झाला आणि उभयंतांचे वैवाहिक आयुष्य बॉंडपटालाही लाजवेल असं रोमान्स-ॲक्शन-इमोशन्स अशा असंमिश्र हिंदोळ्यांवर कधी सुंदर डोंगररांगा-कधी बर्फाळ प्रदेश तर कधी समुद्र किनारे अशा ठिकाणी सुरू झाले. अल्बर्टला पहिली पोस्ट सेंट पिअरे इथं मिळाली. तशी ही नवविवाहित दांपत्यासाठी फारशी सुखावह जागा नव्हती. हाडं गोठवणारी थंडी-जोराची बोचरी हवा-दाट धुकं अशा परिस्थितीत अल्बर्ट नौदलाच्या दवाखान्यात काम करायचा.

सहा हजारांहून अधिक रुग्णांची सेवा करताना त्याला दिवसरात्र पुरायचे नाही. निदान करणं-औषध देणं-प्रसुती करणं-शस्रक्रिया करणं ही सगळी काम तो कर्तव्य म्हणून तर करायचाच पण आवडीनंही करायचा. काम अवघड-कष्टदायक होते पण तितकंच समाधान देणारे आणि शिकवून जाणारंही होते. बरं एकवेळ बॉंड थकेल पण एवढ्या गदारोळातही अल्बर्ट आठवड्यातून दोनदा इंग्रजीची शिकवणी-रोज सकाळी बागकाम-सायंकाळी सुक्ष्मजीवशास्राचा अभ्यास ही सगळी कामंही करायचा सोबत छोटोमोठे प्रयोग-संशोधनकार्य सुरूच.

एव्हाना अल्बर्टच्या पाठीशी दांडगा अनुभव गोळा झाला होता. फ्रेंच वसाहत वैद्यकिय सेवा सुरू झाली तेव्हा अल्बर्टनं तिथं राजीखुशीने नोकरी पत्करली. तिथल्या पाश्चर संस्थेत प्रासंगिक आजारांवर काम करणं अन् तीन महिन्यात सुक्ष्मजीवशास्त्र शिकणं हे अल्बर्टचं मुख्य उद्दिष्ट होते. तिथले संशोधनकार्य-शिक्षण-अनुभव आणि एमिल रक्स यांच्यासोबतची मैत्री हा अल्बर्टला आयुष्यभर पुरेल असा ठेवा ठरला. फ्रांस अंकित व्हिएतनाम मध्ये देवी-रेबिज यांच्यासाठी लस हवी असल्याने पाश्चरनं अल्बर्टला थेट अल्टिमेटम दिले, अल्बर्टनं स्मितहास्य करत हे आव्हान स्वीकारले आणि अनंत अडचणींवर मात करून लवकरच तिथे लॅब उभी करत व्हिएतनामच काय अगदी सिंगापुर-थायलॅंड-जावा-हॉगकॉंग-शांघाय इथपर्यंत आपली सेवा पुरवली.

‘सर्पदंश’ ही अजून एक महत्त्वाची समस्या अल्बर्टला खुणावू लागली. साप-मधमाश्या-विंचू-किटक यांच्यावर अभ्यास करत अल्बर्टनं ॲंटिव्हेनम तयार केलं सोबत कॉलरा-प्लेग यांच्या लसीवरही संशोधन केलं. जीवशास्रज्ञ कॅमिल ग्युरिन यांच्यासोबत अल्बर्टनं क्षयरोगाविरुद्ध ‘बीसीजी’ ही लस शोधून सगळ्या जगाचं लक्ष्य वेधून घेतले. जगभरात मोठ्या संख्येनं लोकं क्षयरोगग्रस्त होते त्यामुळे या संशोधनाने या दोघांनाही अमाप प्रसिद्धी मिळवून दिली.

आज जगभरात अल्बर्टच्या नावाने रस्ते-इमारती-जागा आहेत. अल्जेरियातला एक रस्ता, कंबोडियातील एक हॉस्पिटल, हो-चि-मिन्हमधला पूल-फ्रांसमधला चौक हे सगळं आज अल्बर्टच्या नावानं ओळखले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT