Kia Sonet  Google
विज्ञान-तंत्र

या आहेत हायटेक फीचर्स असलेल्या देशातील सर्वात स्वस्त SUV कार

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी अगदी जवळ आली आहे, त्यामुळे जर तुम्ही नवीन कनेक्टेड टेक्नॉलॉजी असलेली कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट दहा लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर आज आपण अशा काही कारचे ऑप्शन्स जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाल हायटेक फीचर्स तर मिळतीलच पण सोबतच या कार तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली देखील आहेत.

Tata Nexon : ही कार देशातील आघाडीचे कार निर्माता टाटा मोटर्सची Tata Nexon ही कार, देशातील सर्वाधिक विकली जाणारी सब-कॉम्पॅक्ट SUV आहे. कंपनीच्या या लोकप्रिय एसयूव्हीमध्ये देण्यात आलेल्या फीचर्सची यादी खूपच मोठी आहे. Tata Nexon मध्ये तुम्हाला 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. कंपनीच्या iRA तंत्रज्ञानाशिवाय कारमध्ये हरमनची म्युझिक सिस्टीमही देण्यात आली आहे. एवढेच नाही तर ही कार व्हॉईस कमांडही इनेबल देखील आहे. याशिवाय, तुम्हाला Nexon मध्ये कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये देखील पाहायला मिळतात. ही शक्तिशाली एसयूव्ही 3 ड्रायव्हिंग मोडसह येते. ज्यामध्ये सिटी, इकॉनॉमी आणि स्पोर्ट्स मोडचा समावेश आहे. तुम्ही Tata Nexon ला 7.29 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करू शकता.

Mahindra XUV300 : कंपनीने Mahindra XUV300 मध्ये उत्तम फीचर्स दिले आहेत. यामध्ये तुम्हाला कंपनीकडून येणारी म्युझिक सिस्टीम देण्यात आली आहे, जी एंड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्टसह येते, XUV300 मध्ये इनबिल्ट नेव्हिगेशन देखील देण्यात आले आहे. एवढेच नाही तर कार दोन-झोन क्लायमेट कंट्रोल फीचरसह येते. महिंद्रा XUV300 ही देशातील सर्वात सुरक्षित SUV आहे, ज्यामध्ये ग्राहकांना सर्वोत्तम सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत. इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, ही SUV 1197cc पेट्रोल युनिटने सुसज्ज आहे जी 5000 Rpm वर 108.59 HP ची मॅक्सिमम पॉवर आणि 2000-3500 Rpm वर 200 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. या SUV ची किंमत 7.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Kia Sonet : दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन निर्माता कंपनी Kia Sonet अनेक हाय-टेक फीचर्सनी सुसज्ज आहे. या कारच्या इंटरनल फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात बोस स्पीकरसह 26.03 सेमी टचस्क्रीन दिली आहे. याशिवाय, यात 10.67 सेमी कलर क्लस्टर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, व्हायरस प्रोटेक्शनसह स्मार्ट प्युअर एअर प्युरिफायर, मल्टी ड्राईव्ह मोड्स आणि ट्रॅक्शन मोड्स आणि MT रिमोट इंजिन स्टार्ट फीचर दिले आहे. सुरक्षेसाठी, Kia Sonet मध्ये ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, EBD, रिअर पार्किंग सेन्सर, एमर्जन्सी स्टॉप सिग्नल यांसारखी फीचर्स मिळतात. या कारची किंमत 6.87 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT