WiFi Hotspot Tracker Esakal
विज्ञान-तंत्र

Wi-Fi Hotspot : घरामध्ये कुठल्या भागात आहे स्ट्राँग वायफाय? हे अ‍ॅप्स सांगतील परफेक्ट जागा!

घरात नेमकं कुठे स्ट्राँग वायफाय आहे हे माहिती नसल्यामुळे आपण बऱ्याच वेळा राउटरजवळ बसतो.

Sudesh

वर्क फ्रॉम होममुळे बहुतांश लोकांनी आपल्या घरात वायफाय बसवून घेतलं आहे. मात्र, चांगली रेंज (Wi--Fi Range) मिळवण्यासाठी कायम राउटर जवळ बसून राहणं आपल्याला शक्य नसतं. घराच्या कोणत्या भागात वायफायची चांगली रेंज मिळेल, हे पाहण्यासाठी काही अ‍ॅप्स तुमची मदत करू शकतात. ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटीमुळे हे शक्य झालं आहे.

कित्येक वेळा आपल्याला घरातून काम करावं लागतं. अशा वेळी आपल्याला खरंतर इतरांपासून दूर बसणं आवश्यक असतं. मात्र, आपल्या घरात नेमकं कुठे स्टेबल आणि स्ट्राँग वायफाय (Best Wi-fi Spot in House) उपलब्ध आहे हे माहिती नसल्यामुळे आपण बऱ्याच वेळा हॉलमध्ये किंवा वायफाय राउटरजवळ बसतो. यामुळे आपल्या घरातील इतर व्यक्तींना अडचण होते. हे आता टाळता येणार आहे.

ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी

ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटीमुळे (AR) आपल्याला अदृश्य असणारे वायफाय सिग्नल किंवा त्या प्रकारचे इतर सिग्नल स्क्रीनवर पाहता येतात. यामुळे घरातील वायफाय सिग्नल पाहून, चांगली जागा निवडणं सोपं जातं. यासाठी तुम्हाला काही अ‍ॅप्स मदत करतील.

1. आर्किटेक्चर ऑफ रेडिओ

आर्किटेक्चर ऑफ रेडिओ (Architecture of Radio) हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्ही प्रकारच्या फोनवर चालतं. या अ‍ॅपची खासियत म्हणजे, केवळ घरातील वायफायच नाही तर, मोबाईल टॉवर, सॅटेलाईट अशा गोष्टींमधून येणारे सिग्नल देखील हे ओळखू शकतं. यामुळे तुम्ही घरामध्ये कुठल्या भागात किती सिग्नल येत आहेत हे पाहू शकता.

2. वायफाय एआर

या अ‍ॅपच्या (WiFi AR App) माध्यमातून तुम्ही घरातील सर्वात जास्त वायफाय रेंज मिळणारी जागा शोधू शकता. तसंच, तुमच्या वायफायचा स्पीड आणि कोणत्या सिग्नलमुळे अडथळा येतोय हेदेखील पाहू शकता. हे अ‍ॅप सुरू केल्यानंतर तुम्हाला वायफाय आणि 5G असे ऑप्शन दिसतील. यामधील वायफाय ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला घरात थोडं चालावं लागेल.

याठिकाणी तुम्हाला ग्रीन, येलो आणि रेड अशा कलर्सच्या माध्यमातून घरातील कोणत्या ठिकाणी कसं नेटवर्क आहे याची माहिती मिळेल. रेड स्पॉट असणाऱ्या ठिकाणी वायफायचा स्पीड अगदी कमी असेल, तर ग्रीन स्पॉट असणाऱ्या ठिकाणी चांगला स्पीड मिळेल. हे अ‍ॅप केवळ अँड्रॉईट फोनसाठी उपलब्ध आहे.

3. एआर वायफाय अ‍ॅनलायजर

हे अ‍ॅपदेखील (AR WiFI Analyzer) इतर दोन अ‍ॅपप्रमाणेच तुम्हाला घरातील चांगले वायफाय मिळणारी जागा दाखवेल. यासोबतच तुमचा डेटा लीक होणार नाही याची खबरदारी देखील हे अ‍ॅप घेतं. हे अ‍ॅप केवळ आयओएसवर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT