Jio Google
विज्ञान-तंत्र

जिओचे टॉप तीन डेटा प्लॅन, किंमत 151 पासून सुरु

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला दिवसभारात मोबाइल डेटाची जास्त गरज पडत असेल त्यासोबत तुम्ही मोबाइल डेटा वापरुन Amazon Prime किंवा Netflix सारखे OTT प्लॅटफॉर्म पाहत असाल, तर तुम्हाला Jio चे डेटा अ‍ॅड ऑन प्लॅन खूप कामी येतील. Jio तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत तीन डेटा प्लॅन ऑफर करते, जे Jio च्या रेग्युलर रिचार्जसोबत जोडले जाऊ शकतात. जिओ डेटा प्लॅनची किंमत 151 रुपयांपासून सुरु होते. या रिचार्ज पॅकमध्ये 30GB अतिरिक्त डेटा देण्यात येते याशिवाय 201 आणि 251 रुपयांचे रिचार्ज पॅक आहेत. हे तिन्ही डेटा अ‍ॅड ऑन पॅक ३० दिवसांच्या वैधतेसह येतात.

जिओ डेटा अ‍ॅड रिचार्ज पॅक

151 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसोबतच Jio चे 201 आणि 251 रुपयांचे दोन प्री-पेड रिचार्ज पॅक ऑफर केले जातात. 151 रुपयांच्या अ‍ॅड ऑन रिचार्ज पॅकवर 30GB हाय-स्पीड 4G इंटरनेट अनलिमीटेड डेटा मिळतो. त्याच वेळी, 201 रुपयांच्या अ‍ॅड ऑन पॅकवर 40GB अनलिमीटेड डेटा 30 दिवसांसाठी मिळतो. तर 251 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर 50GB अनलिमीटेड डेटा दिला जातो.

डेटा अ‍ॅड ऑन पॅक कधी कामी येतो

तुमचा दिवसाचा डेटा संपल्यावर डेटा अ‍ॅड ऑन पॅक अक्टिव्हेट केला जातो. म्हणजे जर तुम्हाला नियमित रिचार्ज पॅकमधून दररोज 3GB डेटा मिळत असेल, जेव्हा तुम्ही हा 3GB डेटा पूर्णपणे वापरता तेव्हा तुमचा डेटा डेटा पॅक सक्रिय होईल. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार हा 30GB, 40GB आणि 50GB डेटा वापरू शकतात, नंतर ते एका दिवसात पूर्णपणे वापरू शकतात किंवा ते त्यांच्या गरजेनुसार 30 दिवस वापरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT