these are the best electric scooter options in india know price and range details  
विज्ञान-तंत्र

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा विचार करताय? काय आहेत बेस्ट ऑप्शन, वाचा

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर आपण अशा ई-स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत जे सध्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत आणि त्यांच्या पावर आणि परफॉर्मंसने सर्वांची मने जिंकत आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) चांगल्या रेंज सोबतच बजेट फ्रेंडली देखील आहेत. चला तर मग भारतीय बाजारात उपलब्ध असलेले बेस्ट इलेक्ट्रक स्कूटर ऑप्शन्स पाहूयात..

Ather 450X

किंमत- 1,32,426

ही इलेक्ट्रीक स्कूटर तुमच्यासाठी बेस्ट ठरु शकते. Ather 450X या स्कूटरमध्ये तुम्हाला 2.9kWh बॅटरी पॅक मिळतो. तसेच ही देशातील सर्वात फास्ट इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक असल्याचे मानले जाते. तुम्ही ही स्कूटर 5 तासांत पूर्णपणे चार्ज करू शकता. एका चार्जमध्ये हे स्कूटर 60-85 किमी/तास चालते.

Ola S1 Pro

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत- 1,10,149 (एक्स-शोरूम)असून यामध्ये तुम्हाला बॅटरी पॅक- 3.97kWh चा मिळतो. तसेच ही स्कूटर एकदा चार्ज केल्यास 130-180 किमीची रेंज देते. दरम्यान याची बॅटरी चार्ज होण्यासाठीचा चार्जिंग वेळ - 6.5 तास असून टॉप स्पीड ही 115 किमी प्रतितास इतकी आहे.

बजाज चेतक इलेक्ट्रिक

किंमत-1,47,775 (एक्स-शोरूम)

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 3kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो 4.8kW मोटरला पावर देतो. ही मोटर 16Nm पीक टॉर्क आणि 6.44bhp पॉवर जनरेटकरते. कंपनीच्या दाव्यानुसार, बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर इको मोडमध्ये 95 किमी आणि स्पोर्ट मोडमध्ये 85 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. जर आपण चार्जिंग वेळेबद्दल बोलायचे झाले तर सामान्य 5A पॉवर सॉकेटद्वारे ते 5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज केले जाऊ शकते, तर ते फक्त 1 तासात 25 टक्के पर्यंत चार्ज केले जाऊ शकते, परंतु सध्या यासाठी कोणतीही फास्ट चार्जिंग सिस्टम दिलेली नाही.

TVS iQube

किंमत- 1,15,000 (एक्स-शोरूम)

TVS iQube मध्ये 4.4kW ची शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर आहे जी 140 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर फक्त 4.2 सेकंदात 40 kmph चा वेग पकडते. जर आपण या स्कूटरच्या टॉप स्पीडबद्दल बोललो तर ती 78 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर एका चार्जवर कमाल 75 किमीचा पल्ला गाठू शकते.

Okinawa Praise Pro

किंमत- 1,23,000 (एक्स-शोरूम)

Okinawa i-Praise Pro इलेक्ट्रिक स्कूटर डिटेचेबल 2.0kwh लिथियम बॅटरी देण्यात आली आहे, जी कुठेही चार्ज केली जाऊ शकते. स्कूटरच्या बॅटरीसोबत 5 amp चा चार्जर देण्यात आला आहे. बॅटरी चार्ज होण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. एका चार्जवर ही स्कूटर 88 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. त्याचा टॉप स्पीड 58 किलोमीटर प्रति तास आहे.

हिरो फोटॉन

हीरो फोटॉनचे नाव देशातील सर्वात स्वस्त ई-स्कूटरच्या यादीत येते, त्याची एक्स-शोरूम किंमत 65,464 हजार रुपये आहे. त्याच वेळी, या स्कूटर एका चार्जवर 90-100 किमीची रेंज देतात. तसेच त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT