जगात कोरोना महामारीने थैमान घातले असताना आपल्या सगळ्यांना नाईलाजाने घरात अडकून पडावे लागले, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील झाले पण यावर उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षण आणि शिक्षण संपूर्ण जगात सर्वत्र सुरू झाले आहे. सगळीकडे आता ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने ऑनलाइन शिक्षण हे एक आदर्श माध्यम बनले आहे. यामुळे मुले घरात बसूनच शिक्षण घेत आहेत.
कोरोनामुळे जेव्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली तेव्हा सगळीकडेच ऑनलाईन शिक्षण देणे सुरु झाले, सुरुवातीला सर्व मुले स्मार्टफोन वापरुन हे ऑनलाईन वर्ग वर्ग घेऊ लागले, हे क्लासेस ऐकण्यासाठी चांगले मध्यम आहे. पण जेव्हा विद्यार्थ्यांना एखादी असाइनमेंट द्यायची असते तेव्हा मात्र त्यांना कंप्यूटरची गरज पडते. कंप्यूटर हे माध्यम मोबाईल आणि टॅब्लेटपेक्षा अधिक सोयीस्कर आहे आणि ऑनलाइन अभ्यासाची जवळजवळ सर्व कामे यावर सहजपणे करता येतात
बहुतेक लोकांना कंप्यूटरमध्ये लॅपटॉप आवडतो पण ज्यांना मोठ्या स्क्रीनवर वाचायला आवडते, ते मात्र डेस्कटॉपची निवड करतात. जर तुम्हाला एकाच ठिकाणी बसून अभ्यास करायला आवडत असेल, तर आज आपण तुमच्या बजेटनुसार काही डेस्कटॉपबद्दल जाणून घेणार आहोत जेणेकरुन तुम्ही ऑनलाईन आभ्यासासाठी योग्य डेस्कटॉप निवडू शकाल. त्यासाठी सर्वप्रथम, तुमच्या घरात उपलब्ध असलेल्या जागेनुसार, तुम्हाला कोणता डेस्कटॉप हवा आहे ते ठरवा. तुम्हाला बाजारात साध्यापासून ते अपग्रेडपर्यंत सर्व प्रकारचे डेस्कटॉप सापडतील.
टॉवर डेस्कटॉप
डेस्कटॉप टॉवर आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक मूलभूत गरज पूर्ण करेल. जसे की, प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज इ. मात्र त्यासाठी तुम्हाला वेबकॅम, मॉनिटर, कीबोर्ड माउस इत्यादी स्वतंत्रपणे घ्याव्या लागतील. आपण HDMI केबलद्वारे टॉवर डेस्कटॉपला आपल्या टीव्हीशी देखील कनेक्ट करू शकता आणि काम करू शकता.
लेनोवो (Lenovo) आयडिया सेंटर 3 सीरीजच्या किंमती सुमारे, 17,500 पासून सुरू होतात. यामध्ये तुम्ही AMD Athlon Silver 3050U CPU घेऊ शकता. तसेच, तुम्हाला 25,990 रुपयांमध्ये इंटेल सोल्यूशन देखील मिळेल. मात्र हे बेस मॉडेल DOS फ्री पाठवले जाते आणि त्यासाठी स्वतंत्र Windows 10 लायसेंन्स विकत घ्यावे लागू शकते. जर तुम्ही तुमचे बजेट 31,000 पर्यंत किंचित वाढवले तर तुम्हाला CPU सह Windows 10 होम प्री इंस्टॉल मिळेल. जे AMD Ryzen 3 3250U सह अधिक RAM आणि अधिक SSD स्टोरेजसह येईल.
अशाचप्रकारे एचपीमध्ये (HP) देखील टॉवर सोल्यूशन्स ऑफर केले जाते, ज्यामध्ये स्लिम डेस्कटॉप सिरीज ज्याची किंमत सारखीच आहे. मात्र लेनोवोच्या तुलनेत आपल्याला एचपी मध्ये विंडोज 10 फक्त त्यांच्या एंट्री लेव्हल मॉडेलवर मिळते. एचपीच्या एंट्री लेव्हल डेस्कटॉपची किंमत सुमारे 18,000 रुपयांपासून सुरू होते. यासह विविध कॉन्फिगरेशन उपलब्ध आहेत, बहुतेक डेस्कटॉप हे विद्यार्थ्यांसाठी 2019 मायक्रोसॉफ्ट ऑफिस होमसह मिळतात.
AiO डेस्कटॉप
यामध्ये डेस्कटॉपची जागा कमी करण्यासाठी आता संपूर्ण सीपीयू स्क्रीनच्या मागे बसवला जातो, ज्यामुळे तुम्हाला सीपीयू ठेवण्यासाठी जास्तीची जागा लागणार नाही. यात स्क्रीन तसेच वेबकॅम, स्पीकर आणि विंडोज 10 इंस्टॉल करुन दिले जाते. हा डेस्कटॉप चालवण्यासाठी फक्त प्लग इन करणयाची गरज असते. AiO ची निर्मीती HP, Lenovo, Asus, Dell सारख्या मोठ्या कंपन्यां करतात. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरूवात किंमत भारतीय बाजारात 25,000 रुपयांपासून सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.