oneplus nord Googlee
विज्ञान-तंत्र

2021 मध्ये या स्मार्टफोन्सना मिळाली ग्राहकांची सर्वाधिक पसंती

सकाळ डिजिटल टीम

Top Selling Smartphone in 2021: स्मार्टफोन कंपन्या भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन लॉंच करत आहेत. संपत आलेल्या 2021 या वर्षामध्ये देखील अनेक फोन लॉंच करण्यात आले त्यापैकी आज आपण भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकले गेलेल्या स्‍मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत. सध्या शेकडो फोन बाजारात मिळतात, मात्र गेल्या वर्षभरात सर्वाधिक विकले गेलले टॉप स्मार्टफोन कोणते आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला काय फीचर्स ऑफर केले जातात याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.

भारतीय बाजारात Samsung Galaxy F62, Xiaomi Redmi 10 Prime, OnePlus Nord 2, Xiaomi Redmi Note 10S, Samsung Galaxy M32, Poco M3 Pro 5G, Samsung Galaxy M52 5G, Realme GT Master Edition 5G, Moto G40 Fusion Realme GT Neo 2 5G, Poco X3 Pro, Vivo X70 Pro Plus, Xiaomi Mi 11X, Xiaomi Redmi Note 11T 5G, Xiaomi Redmi Note 10T, Realme Narzo 30, OnePlus 9 Pro, Realme Narzo 50A, iPhone हे भारतीय बाजारात सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन आहेत.

Samsung Galaxy F62

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाल्यास Samsung Galaxy F62 या फोनमध्ये तुम्हाला 6.70-इंचाचा सुपर AMOLED प्लस डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सेल आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनला ऑक्टा कोर Samsung Exynos 9825 प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपच्या बाबतीत, या स्मार्टफोनच्या फ्रंटला f/2.2 अपर्चरसह 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा तसेच मागील कॅमेरा f/1.8 अपर्चरसह 64 मेगापिक्सेल, f/2.2 अपर्चरसह 12 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 5 मेगापिक्सलचा तिसरा, तर f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा चौथा कॅमेरा देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित One UI 3.1 वर काम करतो.

Xiaomi Redmi 10 Prime

या स्मार्टफोनमध्ये 1080x2400 रिझोल्यूशनसह 6.50-इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशो 20: 9 आहे आणि रिफ्रेश रेट हा 90 Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये Octa core MediaTek Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनच्या फ्रंटला f/2.0 अपर्चर सह 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला असून मागील कॅमेऱ्यांमध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल पहिला कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सेल दुसरा, f/2.4 अपर्चर आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेल तिसरा आणि चौथा कॅमेरा दिला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली आहे.

OnePlus Nord 2

Nord 2 मध्ये 6.43-इंचाचा डिस्प्ले दिला असून प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 1200 प्रोसेसर आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनच्या मागील कॅमेरामध्ये f/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, f/2.25 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.5 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा हा f/2.45 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. सोबत या स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी असून हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित OxygenOS 11.3 वर काम करतो.

Xiaomi Redmi Note 10S

Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा डिस्प्ले दिला असून यामध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस, f/1.79 अपर्चरसह 64 मेगापिक्सल्सचा पहिला कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा दुसरा, f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा चौथा कॅमेरा f/2.4 अपर्चर कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी f/2.45 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. यात 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येते. तर या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो.

Samsung Galaxy M32

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.40-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशो दिला आहे. प्रोसेसरच्या बाबतीत, हा स्मार्टफोन ऑक्टा कोर मीडियाटेक हेलिओ जी80 प्रोसेसरसह येतो. ऑपरेटिंग सिस्टम बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित One UI 3.1 वर काम करतो. तसेच स्मार्टफोनचा मागील कॅमेरा f/1.8 अपर्चरसह 64 मेगापिक्सेल, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह चौथा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनच्या पुढील बाजूस f/2.2 अपर्चरसह 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. स्टोरेजच्या बाबतीत, या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज असून 6000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगने सपोर्ट करते.

POCO M3 Pro 5G

Poco M3 Pro 5G मध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.50-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला असून हा स्मार्टफोन पोको यलो, पॉवर ब्लॅक आणि कूल ब्लू रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये Octa core MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरासाठी, या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तसेच मागील कॅमेरा f/1.79 अपर्चरसह 48 मेगापिक्सेल, f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा दुसरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा मिळतो. स्टोरेजसाठी, या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिले आहे.

Samsung Galaxy M52 5G

या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपच्या बाबतीत, या स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 64-मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 12-मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 5-मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये f/2.2 अपर्चरसह 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित One UI 3.1 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. बॅटरी बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे.

Realme GT Master Edition 5G

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर मिळते सोबत ऑपरेटिंग सिस्टम Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर हा काम करतो. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनच्या मागील कॅमेरामध्ये f/1.8 अपर्चरसह 64-मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, या स्मार्टफोनमध्ये f/2.5 अपर्चरसह 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कलर ऑप्शन्सच्या बाबतीत हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रे, व्हाईट आणि अरोरा रंगात उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT