Charging  sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Charging : चार्जरशिवाय तुमचा फोन चार्ज करा, या 3 टिप्स ट्राय करून बघा

चार्जर सोबत न ठेवताही या सोप्या टिप्स वापरून चार्ज करू शकता मोबाईल

Aishwarya Musale

अनेकवेळा सहलीला जाताना घाईघाईत आपण आपला फोन चार्जर घेऊन जायला विसरतो. आणि आजकाल तर आपली सर्व कामे फोननेच केली जातात, त्यामुळे आपला फोन पूर्णपणे चार्ज करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन पेमेंट करण्यापासून ते गुगल मॅप दाखवण्यापर्यंतच्या सर्व कामात मोबाईल फोन महत्त्वाची भूमिका बजावतो.

अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या फोनचा चार्जर घरी विसरलात तर काय होईल? यासाठी जास्त काळजी करण्याची गरज नाही, आज आम्ही तुम्हाला अशा तीन पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला या आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडतील.

चार्जरशिवाय फोन चार्ज करण्यासाठी पॉवर बँक, वायरलेस चार्जिंग किंवा यूएसबी पोर्ट सारखे पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.

पॉवर बँक

पॉवर बँक तुम्ही तुमच्यासोबत ठेवल्यास, केबलद्वारे फोन थेट पॉवर बँकशी कनेक्ट करा. अन्यथा, एक गोष्ट केली जाऊ शकते ती म्हणजे फोनला अशा फोनशी कनेक्ट करणे ज्यामध्ये रिव्हर्स चार्जिंगचे फीचर आहे.

प्रत्यक्षात हे फीचर दुसर्‍या आधीच चार्ज केलेल्या फोनला पॉवर बँकमध्ये बदलते. त्यानंतर कनेक्ट केलेला फोन यूएसबी केबलद्वारे चार्ज केला जाऊ शकतो. Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra आणि Motorola Edge 40 सारखे अनेक फोन या वैशिष्ट्यासह येतात.

वायरलेस चार्जिंगची मदत घ्या

वायरलेस चार्जिंग तुम्हाला चार्जर उपलब्ध नसताना मदत करू शकते. तुम्हाला यासाठीवायरलेस चार्जरची मदत घ्यावी लागेल. जे तुमच्या फोनशी सुसंगत आहे.

मात्र, हे फीचर तुमच्या फोनमध्येही असणे महत्त्वाचे आहे. तुमचा फोन जर वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करत असेल तर तुम्ही वायरलेस पॉवर शेअरिंग फीचरसह आलेल्या दुसऱ्या फोनवरून चार्ज करू शकता. असा फोन सापडल्यानंतर, फक्त तुमचा फोन त्या फोनच्या वर तुम्हाला ठेवावा लागेल.

यूएसबी पोर्ट

तुमच्या फोनची बॅटरी जर संपली असेल आणि तुम्ही चार्जर ठेवत नसाल. तर USB पोर्टद्वारे तुम्ही फोन चार्ज करू शकता. तुम्हाला विमानतळ, कॅफे किंवा हॉटेल्समध्ये असे यूएसबी पोर्ट सहज मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: भाऊ आणि मुलगा यांमध्ये श्रीनिवास पवारांची भूमिका काय?

Assembly Elections Voting Percentage: सर्वाधिक गडचिरोलीमध्ये तर सर्वात कमी नांदेडमध्ये; सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात एकूण किती टक्के मतदान?

IND vs AUS: भारतीय संघात ऐनवेळी बदल, युवा फलंदाजाचा तातडीने केला समावेश; BCCI ने का घेतला असा निर्णय?

ST Bus Service : निवडणुकीचा एसटी सेवेला फटका! लालपरीच्या तब्बल ८८४ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय

IPO Rule: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; पुढील महिन्यापासून बदलणार IPOचे नियम?

SCROLL FOR NEXT