जेव्हा तुम्ही नवीन कार खरेदी घेता तेव्हा सुरुवातीचे काही दिवस कारची विशेष काळजी घेतली जाते, पण जेव्हा कार जुनी व्हायला लागते तसे कारची काळजी घेण्याची क्रेझही संपते. तुम्ही लाखो रुपये खर्च करुन घेतलेल्या कारकडे दुर्लक्ष करणे चूकीचे ठरते. जर तुम्ही कारच्या फिटनेसची काळजी घेतली, तर तुम्ही कारच्या मेंटेनन्सच्या खर्च वाचवता येईल. आज आपण अशाच काही टीप्स जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची कार नव्यासारखी ठेऊ शकाल.
ओरिजन पार्ट वापरा
जेव्हा आपण नवीन कार खरेदी करता, तेव्हा त्याच्या काही सर्व्हिस कंपनीकडून मोफत दिल्या जातात, ज्यामध्ये लेबर कॉस्ट राहात नाही. परंतु जर तुम्हाला तुमची कार नेहमी नव्या सारखीच ठेवायची असेल तर नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या वाहनात तुम्हाला इंजिन ऑईलपासून ते कोणत्याही पार्ट हा ओरिजनलच बसवावा लागेल. जर तुम्ही तुमच्या कारमध्ये काही स्वस्तातले इंजिन ऑइल किंवा बनावट पार्ट्स वापरले तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल आणि तुमचा मेंटेंन्स खर्च वाढेल.
कारच्या बॉडीची काळजी घ्या
लोक बऱ्याचदा नवीन कार खरेदी केल्यानंतर पहिल्या एक किंवा दोन महिने कारची जीवापाड काळजी घेतात. कारसाठी कव्हर्स वापरतात, पण काही काळानंतर हा काळजी घेणे बंद होते. याचा परिणाम मग पावसाच्या पाण्यामुळे कारमध्ये गंज लागण्याचा धोका वाढतो. तसेच वेळोवेळी आपली नवीन कार धुणे महत्वाचे आहे आणि कारच्या बाहेरच्या बाजूला दिलेल्या विंड शील्डची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. विंड शिल्ड नेहमी मायक्रो फायबर कापडाने पुसून घ्या जेणेकरून तुमची कार वर्षानुवर्षे चमकत राहील.
क्लचवर जास्त प्रेशर देऊ नका
जर तुम्हाला तुमची नवीन कार डोंगराळ भागात जिथे चढाई असेल आशा रस्त्यांवर चालवायला आवडत असेल तर असा परिस्थितीत कारची स्पीड मर्यादित असणार आहे हे लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवर गती मर्यादीत ठेवा आणि वेळा वारंवार क्लचचा वापरू नका. अनेक वेळा लोक पर्वत चढताना क्लच दाबून कार चालवतात. कोणत्या चुकीच्या पध्दतीने क्लचवर दबाव पडतो आणि नुकसान होण्याची शक्यता वाढते. केवळ हिल स्टेशनवरच नाही तर अनेकांना क्लचवर पाय ठेवून गाडी चालवण्याची सवय असते. यामुळे तुमच्या नवीन कारच्या क्लच प्लेट्स लवकर खराब होतील आणि त्यासोबत कार इंजिनदेखील खराब होऊ शकते.
खराब रस्ते टाळा
बऱ्याचदा आपल्याल कार खराब रस्त्यांनी चालवावी लागते. अशा रस्त्यांवर कार चालवणे संपूर्ण वाहनावर परिणाम होतो. सस्पेंशनपासून इंजिनापर्यंत कार चालण्यासाठी अधिक शक्ती लावावी लागते. याशिवाय, कधीकधी खराब रस्त्यांमुळे, गाडीच्या तळाशी दगड किंवा इतर काही आले तर तुमच्या कारचे सायलेन्सर तूटू शकते किंवा अलायमेंट देखील बिघडू शकते. तसेच कारच्या टायरवर अतिरिक्त दबाव येतो त्यामुळे अशा ठिकाणी कार नेणे टाळा, तुमची कार कमी मेंटनंसवर देखील जास्त दिवस नवीन राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.