Smartphone Shopping esakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Shopping : ऑनलाईन पद्धतीने स्मार्टफोन खरेदी करताय? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Monika Lonkar –Kumbhar

Smartphone Shopping : आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा जणू ट्रेंडच आला आहे. मागील काही वर्षांपासून ऑनलाईन शॉपिंग करण्याला लोकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या वेबसाईट्सवर मोबाईलसोबतच इतर सर्व गोष्टी विक्रीला उपलब्ध असतात.

अनेक जण ऑनलाईन वेबसाईटवरून स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंटमुळे दुकानात जाऊन स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीनेच स्मार्टफोन खरेदी केला जात आहे.

उत्कृष्ट कॅमेरा आणि फिचर्स असलेला स्मार्टफोन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खरेदी करायचा असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. परंतु, ऑनलाईन पद्धतीने स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

रिव्यू चेक करा

जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर, सर्वात आधी जो मोबाईल तुम्हाला खरेदी कऱायचा आहे, त्याच्याबद्दल जाणून घ्या. त्या स्मार्टफोनचे फिचर्स, डिव्हाईसची वैशिष्ट्ये यांची माहिती घ्या.

तुम्ही युट्यूबचा वापर करून त्या स्मार्टफोनचे रिव्यू चेक करू शकता. यामुळे, तुम्हाला मोबाईलची संपूर्ण माहिती मिळू शकेल. त्यामुळे, तुम्हाला खरच असा मोबाईल हवा आहे का? याचे ही उत्तर मिळू शकेल. रिव्यू चेक केल्यामुळे तुम्हाला मोबाईलची खरेदी करण्यास मदत होईल.

कॅशऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा

आजकाल ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर बरेच घोटाळे होतात. त्यामुळे, स्मार्टफोन ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना ती वेबसाईट अधिकृत आहे ना? याची तपासणी करा. यासोबतच त्या वेबसाईटचे रिव्यू पाहूनच तिथून मोबाईल घ्यायचा की नाही, हे ठरवा.

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर स्मार्टफोन खरेदी करताना COD अर्थात कॅशऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा. हा पर्याय उपलब्ध आहे की नाही, हे नक्की तपासा. या पर्यायानुसार, तुम्हाला आधीच ऑनलाईन पैसे भरण्याची गरज पडत नाही. तुमची वस्तू आल्यानंतर पैसे द्यावे लागतात. ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर, त्याचा एक व्हिडिओ अवश्य बनवा, जेणेकरून घोटाळा किंवा काही चुकीचे उत्पादन असल्यास तुम्हाला ते रिटर्न करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT