Lookback 2023 Top Cars eSakal
विज्ञान-तंत्र

Lookback 2023 : यावर्षी लाँच झालेल्या या 10 गाड्या ठरल्या सगळ्यात लोकप्रिय; पाहा संपूर्ण यादी

यामध्ये टाटा, मारुती सुझूकी, ह्युंडाई, होंडा, आणि टोयोटा अशा कंपन्यांचा समावेश आहे.

Sudesh

2023 हे वर्ष आता संपत आलं आहे. नव्या वर्षाची चाहूल लागलेली असतानाच, सरत्या वर्षाने आपल्याला काय काय दिलं हे पाहणंही गरजेचं आहे. हे वर्ष ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अगदी महत्त्वाचं ठरलं. यावर्षी कित्येक नवनवीन चारचाकी गाड्या लाँच झाल्या. मात्र, यातील काही ठराविक गाड्याच ग्राहकांवर आपली छाप सोडू शकल्या.

गेल्या वर्षात ज्या चारचाकी गाड्या चर्चेत राहिल्या, अशा टॉप 10 कार्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. यामध्ये टाटा, मारुती सुझूकी, ह्युंडाई, होंडा, आणि टोयोटा अशा कंपन्यांचा समावेश आहे.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट

टाटा मोटर्सने यावर्षी आपल्या लोकप्रिय एसयूव्ही नेक्सनचं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं आहे. स्टायलिश लुक, हायटेक इंटेरिअर आणि नवीन डिझाईन या गोष्टींसह लाँच केलेली ही चारचाकी यावर्षी भारतात सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली. अर्थात, या लिस्टमधील टाटाची ही एकमेव गाडी आहे.

मारुती सुझुकी

मारुती सुझुकीच्या फ्रॉन्क्स आणि जिम्नी या गाड्यांनी हे वर्ष गाजवलं. अवघ्या सात महिन्यांमध्ये फ्रॉन्क्सचे 75 हजार युनिट्स विकले गेले आहेत. तर दुसरीकडे थारला टक्कर देण्यासाठी लाँच केलेल्या जिम्नी कारलाही ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.

ह्युंडाई

ह्युंडाई व्हेरना या लोकप्रिय गाडीचं नवीन अपडेटेड व्हर्जन कंपनीने यावर्षी लाँच केलं. यामध्ये इंजिन, फीचर्स, डिझाईन आणि इंटेरियर सगळंच अपडेट करण्यात आलं होतं. सगळ्यात चांगली सुरक्षा रेटिंग असणारी ही गाडी भरपूर लोकप्रिय ठरली.

यासोबतच ह्युंडाईची एक्स्टर ही मायक्रो एयसूव्ही देखील लोकप्रिय ठरली. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आलेल्या ह्युंडाई आयॉनिक 5 या गाडीची किंमत जास्त असूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

सिट्रोएन

फ्रान्सची कार कंपनी Citroen ने यावर्षी भारतात A3 Aircross ही कार लाँच केली. टाटा नेक्सन, मारुती ब्रीझा आणि ह्युंडाई व्हेन्यू या गाड्यांना टक्कर देणारी ही गाडी भारतीयांना देखील पसंत पडली.

होंडा

होंडाच्या गाड्यांची क्रेझ कमी होत चालली आहे असं वाटत असतानाच 2023 साली कंपनीने एलिव्हेट ही गाडी लाँच केली. मिड साईज एसयूव्ही सेगमेंटमधील या गाडीचे 100 दिवसांत 20 हजारांहून अधिक युनिट विकले गेले आहेत.

टोयोटा

टोयोटाने यावर्षी भारतात Toyota Innova Hycross ही कार लाँच केली. प्रीमियम एमव्हीपी सेगमेंटमध्ये यामुळे टोयोटाचा दबदबा कायम राहिला होता. जुन्या इनोव्हाचं हे नवं रुप भारतीयांनी चांगलंच पसंत केलं.

एमजी

MG कंपनी हळू-हळू भारतात आपले पाय रोवत आहे. यावर्षी कंपनीने इलेक्ट्रिक गाड्यांच्या सेगमेंटमध्ये परडवणाऱ्या रेंजवर फोकस केलं. यावर्षी आलेल्या MG Comet EV या कारला भारतीयांनी चांगलीच पसंती दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT