भारतीय मार्केटमध्ये अशा कारला जास्त पसंत केले जाते. स्वस्तात मस्त कार या फॅमिली कार म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. भारतीय बाजारात जास्त मायलेज आणि कमी मेंटनेन्स असलेल्या कारला जास्त पसंत केले जाते. भारतीय मार्केटमध्ये ५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत कार उपलब्ध आहेत.
एसयूव्ही आणि प्रीमियम वाहनांची वाढती लोकप्रियता असूनही स्वस्त हॅचबॅक आणि सेडान भारतीय ऑटोमोबाइल बाजरातील प्रमुख भाग आहेत. बजेटमधील छोट्या कारची विक्री खूप प्रमाणात होते. जर तुम्हाला कोणतीही स्वस्त कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला १० लाख रुपये पेक्षा कमी किंमतीतील १० कारची खास लिस्ट आणि सविस्तर माहिती देत आहोत. जाणून घ्या लिस्ट.
Maruti Suzuki Alto
मारुती ऑल्टो ची किंमत २.९४ लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये ०.८ लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ४७ एचपी चे पॉवर आणि ६९ एनएम चे टॉर्क जनरेट करते. मारुतीची ही कार सीएनजी व्हेरियंट मध्ये सुद्धा येते. सीएनजीच्या या ऑल्टोचे मायलेज ३१.५९ किलोमीटर प्रति किलोग्राम आहे. पेट्रोल इंजिनच्या ऑल्टो चे मायलेज २२.०५ किलोमीटर प्रति लीटर आहे.
Hyundai Grand i10 Nios
ची किंमत 5.39 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.46 लाख रुपयांपर्यंत जाते. Hyundai i10 NIOS देखील कंपनी फिटेड CNG सह येते. ज्याची किंमत 7.16 लाख रुपये आहे. येथे नमूद केलेल्या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक लिटर पेट्रोलमध्ये ते 20 किमी, तर एक किलो सीएनजीमध्ये 25 किमीपर्यंत जाऊ शकते.
Maruti Suzuki WagonR
५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत मारुतीची वॅगनआर उपलब्ध आहे. ही कार दोन पेट्रोल इंजिनच्या ऑप्शनमध्ये येते. ज्यात १ लीर आणि १.२ लीटरच्या इंजिनचा समावेश आहे. १ लीटर इंजिनच्या मॉडलची किंमत ४.४५ लाख रुपयांपासून सुरू होते. हे इंजिन ६७ एचपीचे पॉवर देते. याचे मायलेज २१.७९ किलोमीटर प्रति लीटर आहे. स्वस्तात मस्त आणि ५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत कार खरेदी करायची असेल तर तुमच्या समोर मारुती वॅगन आर हाही एक चांगला पर्याय आहे.
Tata Tiago
टाटा मोटर्सची ही एन्ट्री लेवल कार सुद्धा ५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. या कारमध्ये १.२ लीटरचे पेट्रोल इंजिन मिळते. जे ८६ पीएसचे पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. टाटा टियागोची किंमत ४.६० लाख रुपयांपासून सुरू होते. ही मारुतीच्या वॅगनआर, मारुतीच्या सिलेरियो आणि ह्युंदाईच्या सँट्रो कारशी स्पर्धत आहे. कमी बजेट असणाऱ्यांसाठी टाटा टियागो एक चांगला ऑप्शन ठरू शकते. टाटाच्या कारला भारतात चांगली मागणी आहे.
Maruti Suzuki Swift
5.92 लाख रुपयांपासून ते 8.85 लाख रुपयांपर्यंतची ही कार आकर्षक लूक आणि उत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 88.5bhp पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. तुम्हाला ही हॅचबॅक कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या पर्यायामध्ये देखील पाहायला मिळेल. प्रकाराचे मायलेज 23.2 kmpl पर्यंत आहे.
मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटसह मारुती स्विफ्ट ZXI ची किंमत तुम्हाला 7.50 लाख रुपये मिळते आणि ती 23.2 kmpl चा मायलेज देते. त्याच वेळी, 7.32 लाख रुपयांमध्ये, तुम्हाला Maruti Swif VXI चे AMT प्रकार मिळेल, जे 23.76 kmpl चे मायलेज देते.
Tata Punch
कंपनीने भारतीय बाजारात टाटा पंच एसयूव्हीच्या बेसिक व्हेरिअंटसाठी एक्स-शोरूम किंमत ५.४९ लाख रुपये निश्चित केली आहे. तर, टॉप व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत ८.४९ लाख रुपयांपर्यंत जाते. या किंमती प्रास्ताविक आहेत, म्हणजेच कंपनी नंतर कारची किंमत वाढवू शकते. टाटा पंच मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 18.97 kmpl मायलेज देईल आणि AMT ट्रान्समिशन व्हेरिअंटमध्ये 18.82 kmpl मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. हा मायलेज ARAI प्रमाणित आहे.
Maruti Suzuki Dzire
CNG दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे यामध्ये VXi आणि ZXi यांचा समावेश आहे. या दोन्ही व्हेरिएंटची किंमत ६.५१ लाख रुपयांपासून सुरू होते ते 8.82 लाख रुपये इतक्या आहेत. डिझायर सीएनजी सेडान सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध आहे. मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, डिझायर सीएनजी मॉडेलचे मंथली सबस्क्रिप्शन शुल्क 16,999 रुपयांपासून सुरू होते.
CNG किट 1.2-लीटर K-Series ड्युअल-जेट ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह काम करते. हे इंजिन CNG मोडमध्ये आहे आणि 6,000 rpm वर 77 PS पॉवर आउटपुट आणि 98.5 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, हे इंजिन 31.12 किमी/किलो मायलेज देते.
Renault Triber
ही छोटी ७ सीटर कार सुद्धा ५ लाखांच्या खाली किंमतीत खरेदी करता येते. या सब कॉम्पॅक्ट एमपीव्हीची किंमत ६.३३ लाख पर्यंत आहे. यात १.० लीटरचे पेट्रोल इंजिन मिळते. जे ७२ पीएसचे पॉवर आमि ९६ एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच ५ स्पीड मॅन्यूअल आणि एमएमटी गियरबॉक्स ऑप्शन मिळतात. जर तुम्हाला ६ लाख रुपये कमी किंमतीत कार खरेदी करायची असेल तर रेनॉची ट्रायबर ही गाडी सुद्धा एक बेस्ट ऑप्शन ठरू शकते.
Maruti Suzuki Baleno
भारतीय बाजारात याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ६.३५ लाख रुपये आहे. जी ९.४९ लाख रुपयांपर्यंत जाते. आधीच्या तुलनेत यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. यात इन बिल्ट नेक्स्ट जनरेशन सुझुकी कनेक्ट टेलेमेटिक्स सिस्टम दिले आहे, जे ४० हून जास्त कनेक्टिविटी फीचर्स दिले आहे. हे कार आयडल स्टार्ट स्टॉप टेक्नोलॉजी सोबत येते. याचे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन सोबत येते.
Mahindra Bolero Neo
कंपनीने दमदार Bolero Neo एसयूव्ही फक्त तीन व्हेरिअंटमध्ये उतरवली होती. आता महिंद्राने Bolero Neo अजून एका व्हेरिअंटमध्ये N10 (O) लाँच केली आहे. एकीकडे Bolero Neo बेसिक व्हेरिअंट N4 ची एक्स-शोरुम किंमत ८.४८ लाख रुपये, N8 ची किंमत ९.४८ लाख आणि N10 ची किंमत ९.९९ लाख रुपये आहे, तर आता नवीन N10 (O) व्हेरिअंटची किंमत १०.६९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
या सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत. कंपनीने १.५-लिटर mHawk डिझेल इंजिन दिले असून हे इंजिन १०० पीएस पॉवर आणि १६० एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिनसोबत ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. याशिवाय यामध्ये टीयूवी300 प्रमाणे फ्युअल सेविंग इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजी देखील आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.