Best suv Cars in india under 10 lakhs google
विज्ञान-तंत्र

दहा लाखांत मिळणाऱ्या भारतील बेस्ट SUV कार; पाहा किंमत स्पेसिफिकेशन्स

सकाळ डिजिटल टीम

Best suv Cars in india under 10 lakhs : भारतीय बाजारपेठेत बजेट SUV कारना जास्त मागणी आहे. जर तुमचे बजेट दहा लाख रुपयांच्या आत असेल आणि तुम्हाला सुरक्षित कार घ्यायची असेल, तर भारतात 10 लाखांच्या बजेटमध्ये अशा अनेक कार आहेत, ज्या त्यांच्या बेस्ट फीचर्ससाठी प्रसिद्ध आहेतच सोबतच बेस्ट ड्रायव्हिंग एक्सपिरीयंससाठी देखील ओळखल्या जातात. एवढेच नाही तर देशातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहेत. चला तर मग जाणून घेऊया दहा लाख रुपयांच्या खाली उपलब्ध असलेल्या दमदार SUV कार्सबद्दल.

टाटा नेक्सॉन (TATA Nexon)

स्वदेशी ऑटोमेकर टाटा मोटर्सच्या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित कारांपैकी एक म्हणजे Tata Nexon. या कारमध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्याय मिळतात. हे वाहन ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. Tata Nexon ही देशातील दुसरी सर्वात सुरक्षित सब-कॉम्पॅक्ट SUV आहे, तिला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळालेलेल आहे.

Nexonमध्ये तुम्हाला 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन पर्याय मिळतात. दोन्ही इंजिन अनुक्रमे पेट्रोलमध्ये 170Nm पीक टॉर्क आणि 260Nm डिझेलमध्ये 110hp ची पावर जनरेट करतात. या कारची किंमत 7.28 लाख रुपये एक्स-शोरूम पासून सुरु होते,

महिंद्रा XUV300

स्वदेशी वाहन उत्पादक महिंद्राची XUV300 ही कॉम्पॅक्ट SUV त्याच्या सेगमेंटधील सर्वात लोकप्रिय कार आहे. 5 सीटर असण्याव्यतिरिक्त, ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, ही देशातील सर्वात सुरक्षित SUV आहे, कारण Mahindra XUV300 ला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. हे 1.2-लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 108.59 HP पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

याशिवाय यात 1.5 लीटर डिझेल इंजिन देखील देण्यात आले आहे, जे 115 Bhp पॉवर आणि 300 Nn टॉर्क जनरेट करते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही याला 7.95 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करू शकता.

टाटा पंच (TATA Punch)

नवीन टाटा पंच या पोर्टफोलिओमध्ये Nexon च्या अगदी खाली आहे. जर स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, टाटा पंच ही गाडी BS6स्टँडर्ड नुसार 1.2-लिटर, तीन-सिलेंडर, पेट्रोल इंजिनसह विकली जात आहे . जे 84.8 hp ची पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT शी जोडलेले आहे. इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे इंजिन स्टार्ट/स्टॉप फंक्शनसह येते. सेफ्टी स्टँडर्डच्या बाबतीत, या SUV ला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. नवीन टाटा पंचची किंमत 5.49 लाख ते 9.09 लाख रुपये यादरम्यान आहे.

पंचमध्ये Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅनालॉग युनिटसह 7.0-इंच डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलॅम्प, 6-स्पीकर इत्यादी फीचर्स मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT