best selling Cars in India this year Esakal
2021 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या कार (Top Selling Cars in Year 2021)-
दोन वर्षांपासून कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आले. अर्थातच याचा फटका ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रालाही बसला. भारतही याला अपवाद नव्हता. परंतु या संपूर्ण वर्षाचा आढावा घेता यंदा ऑटो क्षेत्र सावरल्याचं दिसून आलं. गेल्या काही महिन्यांत गाड्यांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक व्हेईकल्सची (EV-Electric Vehicle) मागणीही प्रचंड वाढल्याचं दिसत आहे. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही मारूती सुझूकीच्या (Maruti Suzuki) गाड्यांना लोकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया यंदाच्या वर्षातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार (Best Selling Cars) कोणत्या होत्या, हे आपण जाणून घेणार आहोत.
1. मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)- मारुती सुझुकीची सुप्रसिद्ध कार वेगनआर यंदा सर्वाधिक विक्री (best Selling Car) झालेल्या कारमध्ये पहिल्या क्रमांकावर (First Rank) होती. या गाडीची एक्स शोरुम किंमत ४.९३ लाख असून कारमध्ये ११९७ सीसी इंजिन आहे. ही गाडी पेट्रोलवर २१.७९ किमीचा मायलेज देते. जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत वॅगनआरची तब्बल १.७४ लाख युनिट्स विकली आहेत.2. मारुती सुझुकी आल्टो (Maruti Suzuki Alto)- मारुती सुझुकीच्या आल्टो गाडीला सर्वाधिक मागणी आहे. सर्वसामान्यांना परवडणारी कार म्हणून आल्टो कार प्रसिद्ध आहे. वॅगनआर नंतर सर्वाधिक मागणी आल्टोलाच आहे. एक फॅमिली कार म्हणून या गाडीकडे पाहिलं जातं. कंपनीने नोव्हेंबरपर्यंत १.६२ लाख गाड्या विकल्या आहेत. ही गाडी सीएनजी आणि पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत ३.१५ लाख आहे.
3. मारुती सुझुकी बलेनो ((Maruti Suzuki Baleno)- मारुती सुझुकी बलेनो या वर्षात सर्वाधिक विक्री झालेली तिसरी कार आहे. बलेनोची सुरुवातीची किंमत (Ex showroom Price) ५.९९ लाख रुपये आहे. कारचे इंजिन ११९७ सीसी आहे, जे ८८.५ बीएचपी कमाल पॉवर जनरेट करू शकते. कंपनीने एकूण १.५५ लाख युनिट्सची विक्री केली आहे.4. मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)- मारुती सुझुकी स्विफ्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. स्विफ्टची सुरुवातीची किंमत ५.८५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात ११९७ सीसीचे इंजिन आहे. कंपनीने मारुती सुझुकी स्विफ्टच्या एकूण १.५१ लाख युनिट्सची विक्री केली आहे.
5. मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eco)- मारुती सुझुकी पाचव्या क्रमांकावर आहे. ही ७ सीटर एमपीव्ही आहे. कंपनीने त्याचे सुमारे १ लाख युनिट्स विकले आहेत. इकोची सुरुवातीची किंमत ४.३८ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.