Tech company Sakal
विज्ञान-तंत्र

Tech Company Earnings: बाबो! अ‍ॅपल-गुगल दर सेकंदाला करतात तब्बल 'एवढी' मोठी कमाई, अंबानी-अदाणी देखील मागे

अ‍ॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या टेक कंपन्या दर सेकंदाला कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे. एखाद्या व्यक्तीच्या आठवड्याभराच्या रक्कमेपेक्षा ही कमाई जास्त आहे.

सकाळ डिजिटल टीम

Google-Apple Revenue: जगात सध्या टेक कंपन्यांचा बोलबाला आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी पाहिली तर यामध्ये सर्वात आघाडीवर टेक कंपन्याच पाहायला मिळतात. मात्र, अ‍ॅपल आणि गुगल सारख्या कंपन्या एका सेकंदात किती कमाई करतात तुम्हाला माहितीये का? हा आकडा एवढा मोठा आहे की, यासमोर अंबानी आणि अदाणी यांची कमाई देखील कमी आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

आयफोनची निर्मिती करणारी कंपनी अ‍ॅपल दर सेकंदाला तब्बल १,८२० डॉलर म्हणजेच जवळपास १.४८ लाख रुपयांपेक्षा अधिकची कमाई करते. अ‍ॅपलची एक दिवसाची कमाई १५७ मिलियन डॉलर (जवळपास १,२८२ कोटी रुपये) आहे.

मायक्रोसॉफ्ट आणि गुगलची कमाई आहे अफाट

अ‍ॅपलप्रमाणेच गुगल आणि मायक्रोसॉफ्ट देखील दररोज १०० मिलियन डॉलरपेक्षा अधिकची कमाई करतात. मायक्रोसॉफ्टची एक सेकंदाची कमाई १,४०४ डॉलर (जवळपास १.१४ लाख रुपये) आहे. तर वॉरेन बफे यांच्या मालकीच्या बर्कशायर हॅथवे कंपनीची दर सेकंदाची कमाई १,३४८ डॉलर (जवळपास १.१० लाख रुपये) आहे.

अमेरिकेतील एक कामगार त्याच्या आयुष्यभरात सरासरी १.७ मिलियन डॉलर (जवळपास १४ कोटी रुपये) कमवतो. अमेरिकेतील नागरिकांचा सरासरी वार्षिक पगार ७४,७३८ डॉलर, तर दर आठवड्याची सरासरी कमाई १,४३३.३३ डॉलर आहे.

याचाच अर्थ अ‍ॅपलची दर सेकंदाची कमाई लोकांच्या आठवड्याच्या कमाईपेक्षा अधिक आहे. अल्फाबेटची (गुगल) दर सेकंदाची कमाई १,२७७ डॉलर (जवळपास १,०४,२६८ रुपये) आणि मेटाची कमाई ९२४ डॉलर (जवळपास ७५,४४६ रुपये) आहे. दर सेकंदाला कमाईच्या बाबतीतल अ‍ॅपल सर्वात पुढे आहे.

एक सेकंदाला १७,५५३ रुपयांचे नुकसान

Uber ला वर्ष २०२१ मध्ये दर सेकंदाला २१५ डॉलर (जवळपास १७,५५३ रुपयांचे) नुकसान झाले आहे. जनरल इलेक्ट्रिकच्या वार्षिक नफ्याच्याबाबतीत १०.६८ बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. तर मेटाच्या कमाईत १०.६६ बिलियन डॉलर्सची वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT