Independence Day 2024 esakal
विज्ञान-तंत्र

Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिन स्पेशल! ही ट्रेंडिंग गाणी आणि हॅशटॅग वापरुन तुमच्या फोटो आणि रील्सना बनवा एकदम खास

Saisimran Ghashi

Independence Day Trending Video Ideas : आज आपण ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.हा देशभक्तीचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर सर्वांना स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ आणि रील्स शेअर करायचे असतात. तुम्हालाही तुमचे आजचे खास फोटो खूप व्हायरल करायचे असतील. तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

आम्ही तुम्हाला तुमचे फोटो-व्हिडिओला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याला जास्तीत जास्त पसंती कशी मिळेल याच्या काही टिप्स देणार आहोत.

ट्रेन्डिंग गाणी वापरा

"परदेस" मधील "आई लव्ह माई इंडिया" हे गाणं सध्या खूप लोकप्रिय आहे. "केसरी" मधील "तेरी मिट्टी" हे गाणं देखील चांगलं पर्याय ठरेल. "अरे वतन" हे देशभक्ती जागृत करणारे गाणं तुमच्या फोटो-व्हिडिओला भावपूर्ण बनवेल.त्याचबरोबर राजी चित्रपटातील "ए वतन",मेरी कॉम चित्रपटमधील "सलाम इंडिया" आणि फना चित्रपटातील "देश रंगीला" या सर्व पॉप्युलर आणि ट्रेंडिंग गाण्यावर तुम्ही व्हिडिओ आणि रील्स बनवू शकता,तसेच तुमच्या फोटोवरदेखील लावू शकता.

#हरघरतिरंगा अभियानात सहभागी व्हा

हर घर तिरंगा अभियानाचे हे तिसरे पर्व आहे. भारत सरकारच्या "हर घर तिरंगा" वेबसाइट (https://harghartiranga.com/) वर जाऊन "अपलोड सेल्फी" च्या पर्यायावर क्लिक करा. तुमचे नाव, फोन नंबर आणि देशाची माहिती भरा. त्यानंतर तिरंग्यासोबतचा फोटो घेऊन अपलोड करा. "मी माझ्या प्रतिमेचा वापर पोर्टलवर करण्यास परवानगी देतो" ही गोष्ट वाचून सबमिट करा. नंतर तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता आणि ऑनलाइन शेअर करू शकता.

#स्वातंत्र्यदिन हे हॅशटॅग वापरा

तुमच्या फोटो-व्हिडिओसोबत #स्वातंत्र्यदिन2024, #तिरंगा, #भारत हे ट्रेंडिंग हॅशटॅग वापरा. तुमच्या मजकुराशी संबंधित हॅशटॅग वापरण्याने तुमच्या फोटो-व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचतील.

देशभक्ती जागृत करणारे कॅप्शन लिहा

तुमच्या फोटो-व्हिडिओला दोन ओळींची शायरी किंवा एखादा शब्द असलेले कॅप्शन लिहावे. यामुळे तुमचा फोटो-व्हिडिओ अधिक अर्थपूर्ण होईल. अशा कॅप्शनसाठी तुम्ही गुगलवर शोधू शकता.

या टिप्स वापरून स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात सहभागी व्हा आणि तुमचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून हा स्वातंत्रदिन आणखी खास बनवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT