Torrent Links esakal
विज्ञान-तंत्र

Torrent Links : चित्रपट फ्री मध्ये बघण्याच्या नादात होईल मोठं नुकसान

आजकाल filmyzilla, Tamilrockers आणि movierulez या टोरेंट वेबसाइट्सची खूप चलती

सकाळ डिजिटल टीम

Torrent Links : तुम्हाला जॉन विक, भोला, भीड सारखे चित्रपट फ्री मध्ये बघायचे आहेत का? तसं तर आजकाल बहुतेक चित्रपट थिएटरमधून गेले की OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जातात. ते पाहण्यासाठी आपल्याकडे नेटफ्लिक्स , प्राइम व्हिडिओ आणि हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन असावं लागतं.

पण OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्यासाठी, तुम्हाला मेंबरशिप प्लान घ्यावा लागतो आणि त्यासाठी लागतात पैसे...त्यामुळे बरेच लोक टोरेंट लिंकच्या माध्यमातून चित्रपट डाउनलोड करतात. इंटरनेटवर अशा अनेक टोरेंट वेबसाइट्स आहेत जिथे चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसातच डाउनलोडसाठी उपलब्ध होतात. या टोरेंट साइट्सची लिंक टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाते.

या टोरेंट वेबसाइट्सची नावं काय असतात?

आजकाल filmyzilla, Tamilrockers आणि movierulez या टोरेंट वेबसाइट्सची खूप चलती आहे. यासोबतच यूजर्स Free Download, MP4 HD Download, Telegram Links, Movie Free HD Download, Free Download Link सारखे कीवर्ड वापरून चित्रपटांची डाउनलोड लिंक शोधतात.

जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. कारण तुम्ही अशा पद्धतीने चित्रपट डाऊनलोड करत असाल तर तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

टोरेंट साइट्स म्हणजे काय आधी समजून घेऊ?

टोरेंटिंग ही फाइल शेअरिंगची एक पद्धत आहे ज्यामध्ये युजर थेट फाइल्स शेअर करू शकतात. यासाठी फाईल कोणत्याही सेंट्रलाइज्ड सर्व्हरद्वारे शेअर करावी लागणार नाही. त्यामुळे टोरेंटवरून काहीही डाउनलोड करणे युजर्ससाठी धोकादायक ठरू शकते.

टॉरेंटवरून चित्रपट डाउनलोड करणं धोकादायक

टॉरेंटिंगसाठी सर्वात मोठा धोका म्हणजे मालवेअर आणि व्हायरस. टोरेंट साइट्समध्ये P2P शेअरिंग प्रोटोकॉल वापरला जातो आणि हॅकर्स सहजपणे त्याचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय काही जाहिरातदार थर्ड पार्टी याचा गैरवापर करतात.

जेव्हा तुम्ही फाईल डाउनलोड करण्यासाठी टॉरेंटवरील लिंकवर क्लिक करता, तेव्हा काहीवेळा फाइलसोबत काही व्हायरसही तुमच्या डिव्हाइसमध्ये इंस्टॉल केले जातात. किंवा बर्‍याच वेळा युजर्स मूळ लिंकऐवजी बनावट लिंकवर क्लिक करतात, त्या बदल्यात बरेच मालवेअर त्यांच्या डिव्हाइसवर पोहोचतात.

टॉरेंट वरून काहीही डाउनलोड करताना तुम्ही सतर्क असलं पाहिजे. सुरक्षिततेसाठी, डाऊनलोड केलेली फाईल अँटीव्हायरसने स्कॅन केल्यानंतरच उघडावी. शिवाय सगळ्यात सेफ काय असेल तर अथोराइज्ड सोर्सवर जाऊन चित्रपट पहावेत. कारण थोडे पैसे वाचवण्याच्या नादात तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT