toyota electric innova may launch soon in india know details  
विज्ञान-तंत्र

टोयोटा इनोव्हा येतेय इलेक्ट्रिक अवतारात; लवकरच होणार लॉन्च

सकाळ डिजिटल टीम

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहेत. हे पाहता आता ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. अनेक वाहन निर्मात्यांनी भारतीय बाजारपेठेत त्यांच्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत, दरम्यान या वर्षी देखील अनेक वाहन कंपन्या ईव्ही सेगमेंटमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहेत. यातच दिग्गज कंपनी टोयोटा लवकरच भारतात इनोव्हा MPV ला इलेक्ट्रिक अवतारात सादर करू शकते.

भारत आणि थायलंडमध्ये टेस्टिंग सुरू

टोयोटा सध्या भारत आणि थायलंडमध्ये नवीन एमपीव्हीची टेस्टिंग करत आहे. नवीन MPV पुढील जनरेशनटी इनोव्हा MPV असण्याची अपेक्षा आहे, जी 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाईल. विशेष म्हणजे, इनोव्हा इलेक्ट्रिकची संकल्पना आज जकार्ता येथे इंडोनेशिया इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये अधिकृत लॉन्च होण्यापूर्वी लीक झाली आहे.

टोयोटा इनोव्हा इलेक्ट्रिक कन्सेप्ट प्रोटोटाइप स्टेजमध्ये असल्याचे लीक्समधून समोर आले आहे. जपानी ऑटोमेकर भविष्यात निवडक बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रिक MPV लाँच करू शकते. ही संकल्पना MPV च्या सध्याच्या जनरेशनवर आधारित असल्याचे दिसते, जी भारतात इनोव्हा क्रिस्टा म्हणून विकली जात आहे. त्याच वेळी, भारतीय बाजारपेठेत स्पॉट केलेले वाहन लीक झालेल्या संकल्पनेपेक्षा वेगळे दिसते.

यात विशेष काय असेल?

टोयोटा इनोव्हा इलेक्ट्रिक कन्सेप्ट सध्याच्या मॉडेलप्रमाणेच असल्याचे दिसते. मात्र, याला इलेक्ट्रिक लूक देण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. या कन्सेप्ट कारला मध्यभागी एक षटकोनी फ्रेम असलेली शट-ऑफ फ्रंट ग्रिल मिळते, जी LED DRL सह LED हेडलँपने वेढलेली आहे. त्याची कन्सेप्टच्या फोटोवरुन दिसते की ती नवीन फ्रंट बंपरसह येईल, जे व्हर्टिकली पोजीशन असलेल्या फॉग लॅम्प हाउसिंगला समायोजित करते. नवीन अलॉय व्हील वगळता साइड प्रोफाईल सध्याच्या कारप्रमाणेच दिसते. तसेच, कडांवर निळे ग्राफिक्स जोडले गेले आहेत, जे कार इलेक्ट्रिक असल्याचे दाखवतात

इंटेरिएर क्रिस्टा सारखेच

EV बॅजसह आणि इनोव्हा EV डिकल्स देखील क्वार्टर पॅनलच्या मागील बाजूस दिसत आहेत. MPV च्या मागील बाजूस प्रमुख इलेक्ट्रिक बॅज दिसतो. बाकीचे डिझाईन रेग्युलर IC-इंजिन असलेल्या व्हेरिएंटप्रमाणेच आहे. चार्जिंग पोर्ट डाव्या मागील बाजूस ठेवलेले आहे. त्याच वेळी, त्याचे इंटीरियर इनोव्हा क्रिस्टासारखे आहे. हे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 3-स्पोक मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल इत्यादी यामध्ये दिले जाण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT