Tracking Device  esakal
विज्ञान-तंत्र

Tracking Device : कामाच्या छोट्या छोट्या वस्तू विसरायची सवय आहे? मग वापरा AirTag

सकाळ डिजिटल टीम

Tracking Device : अनेक वेळा आपण पाकीट, चावी, रिमोट यांसारख्या छोट्या गोष्टी कुठेतरी ठेवून देतो आणि मग विसरून जातो की ते नक्की कुठे ठेवलेलं. अशा वेळेस एखादा ट्रॅकिंग डिव्हाइस असतं तर बर झालं असतं; असाही विचार मनात येतो.

पण आता हरवलेल्या गोष्टी शोधणे सोप झालं आहे. कारण अस एक डिव्हाइस आता बाजारात आलेलं आहे. तुम्ही या डिव्हाइसच्या मदतीने आपला पेन, पाकीट, चावी अशा छोट्या छोट्या गोष्टी अगदी बिनधास्त शोधू शकतात.

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एअरटॅगच्या मदतीने एका प्रवाशाला त्याचे चोरीचे सामान तर सापडलेच, पण चोराला पकडण्यात पोलिसांनाही मदत झाली. प्रवाशाने त्याच्या चेक-इन केलेल्या सामानात हा एअर टॅग ठेवलेला होता.

एअरटॅग म्हणजे काय?

एअरटॅग हे ऍपलच ट्रॅकिंग डिव्हाइस आहे, जे आपण सामानाशी कनेक्ट करून त्यांना ट्रॅक करू शकतो. सुमारे 11 ग्रॅम वजनाच हे छोट डिव्हाइस छोटा पॅकेट बडा धमाका सारखं आहे. तुमच हरवलेले सामान परत मिळवण्यात तर हे पटाईत आहेच पण त्याचबरोबर विमानतळावर तुमचे सामान कसे हाताळले जाते हे देखील तुम्ही याच्या मदतीने बघू शकतात. एवढेच नाही तर एअरलाइनने तुमचे सामान खराब केले असेल तर तुम्ही पुरावा म्हणून एअरटॅग डेटा देखील त्यांना सादर करू शकता.

AirTag कसे काम करते?

एप्रिल 2021 रोजी Apple ने Airtag लाँच केले होते. हे अ‍ॅपलच्या फाइंड माय नेटवर्कच्या मदतीने अल्ट्रा-वाइडबँड टेक्नॉलॉजीचा वापर करून वस्तूंचा मागोवा घेते. तुम्‍ही तुमच्‍या AirTag डिव्‍हाइसला Apple फोन, iPads आणि तुम्‍हाला ट्रॅक करण्‍याच्‍या इतर कोणत्‍याही वस्तुशी कनेक्‍ट करू शकता आणि तुमच्‍या फोनवर तुमची वस्तू कुठे आहे हे सहजपणे शोधू शकता. एअरटॅगच्या मदतीने, आपण कार, पर्स चोरी इत्यादी घटना देखील थांबवू शकता.

Airtags वापरा, पण काळजी घ्या

जानेवारी 2022 मध्ये अमेरिकेत सुमारे सहा महिलांनी पाठलाग केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितल की त्यांना त्यांच्या कारमध्ये, पर्समध्ये आणि अगदी त्याच्या घरात एअरटॅग सापडले, जे त्याचे नव्हते. खरतर, या डिव्हाइसचा वापर गुन्हेगारही करू शकतात. त्यामुळे हे उपकरण कुठेतरी दिसले तर सावध व्हा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT