TRAI New Update : मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल आणि फसव्यां कॉल्सचा त्रास आता कमी होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) देशभरातील वापरकर्त्यांना त्रास देणाऱ्या या फसव्यांवर लगाम लावण्यासाठी नवीन नियम लागू करत आहे.
1 सप्टेंबर 2024 पासून TRAI देशभरात होणाऱ्या फसव्या कॉल आणि स्पॅम कॉलना रोखण्यासाठी नवीन नियम लागू करणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. यापूर्वी AI वापरून अशा कॉल रोखण्याचा प्रयत्न झाला होता. पण आता TRAI त्यापुढे जाऊन कडक नियम लागू करत आहे.
नवीन नियमानुसार, तुमच्या नेटवर्कवरून फसवे कॉल झाले तर त्याची जबाबदारी संबंधित दूरसंचार कंपन्यांची असेल. एखाद्या ग्राहकाने फसव्या कॉलची तक्रार केल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित दूरसंचार कंपनीची असेल. यामुळे फसव्या कॉलची संख्या लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
मोबाईल वापरकर्त्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी TRAI ने कठोर भूमिका घेतली आहे. दूरसंचार कंपन्यांवर कडक नियम लादून वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी हा नवीन नियम तयार करण्यात आला आहे. फसव्या आणि प्रमोशनल कॉलसाठी फसव्या पद्धतीचा वापर हा दूरसंचार नियमांचा स्पष्ट भंग आहे, असे TRAI ने स्पष्ट केले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी TRAI ने एक मजबूत कार्यवाही आराखडा तयार केला आहे.
मोबाईल नंबरचा वापर करून टेलिमार्केटिंग किंवा प्रमोशनल कॉल केल्यास तो नंबर दोन वर्षांसाठी ब्लॅकलिस्टेड होईल, असे TRAI ने स्पष्ट केले आहे. आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सरकारने आधीच 160 हा विशेष नंबर सिरीज सुरु केली होती. मात्र, अनेक वापरकर्त्यांना अजूनही खासगी नंबरवरून प्रमोशनल कॉल येत आहेत. त्यामुळे आणखी कडक नियमांची गरज निर्माण झाली होती.
फसव्या किंवा स्पॅम कॉलमध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे TRAI ने स्पष्ट केले आहे. स्पॅम किंवा फसव्या कॉलचे कोणतेही प्रकार आता सहन केले जाणार नाहीत आणि जबाबदार लोकांवर कारवाई केली जाईल, असे TRAI ने नमूद केले आहे. त्यामुळे तुमच्या नंबरचा वापर प्रमोशनल कॉलसाठी करत असाल तर सावध रहा कारण हा नवीन नियम कडकपणे लागू केला जाणार आहे.
या नवीन नियमांची अंमलबजावणी करून TRAI सर्व वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित दूरसंचार वातावरण निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. यामुळे फसवे कॉल आणि फसवणूक कमी होऊन वापरकर्त्यांना त्रास कमी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.