सध्या कोरोनामुळे बहुतेक लोक घरात राहून काम करत आहेत, म्हणूनच सध्या चांगली इंटरनेट सेवा असणे खूप महत्वाचे झाले आहे. जर इंटरनेट स्लो असेल तर त्याचा परिणाम कामावर देखील दिसून येतो. इतकेच नाही, स्लो इंटरनेटमुळे फाइल डाऊनलोड करता येत नाही. याशिवाय कामही वेळेवर संपत नाही. जर तुमच्या वेब सर्च स्क्रोलिंगची स्पीड कमी असेल तर आश्चर्य वाटू दऊ नका याचे एकमेव कारण हे तुमचे स्लो इंटरनेट आहे हे समजून घ्या.
बऱ्याचदा संगणकावर काम करताना लोकांना इनर फंक्शन्स माहिती नसतात. लक्षात असु द्या की अडचणींची मालिका ज्यायमुळे तुमचे इंटरनेट स्लो चालते. पण यापैकी काही अडचणी सोडवल्या जाऊ शकतात आणि काही वापरकर्त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहेत. बऱ्याचदा संगणकाच्या अंतर्गत सिस्टीमुळे इंटरनेट स्लो होते, म्हणून जेव्हा जेव्हा अशा समस्यांना सामोरे जावे लागते तेव्हा या टिप्स फॉलो करा.
हिस्ट्री आणि कुकीज क्लिअर करा
बर्याच वेळा काम करत असताना आपण बर्याच गोष्टी सर्च करत राहतो, हे कुठेतरी स्टोरेज भरत असते. कुकीज बद्दल सांगयचे झाल्यास ही एक टेक्स्ट फाईल आहे जी डेटाच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये साठवली जाते, ती आपल्या संगणकावर ऑनलाइन सर्फ करण्यासाठी आयडी म्हणून वापरली जाते. आपण जितक्या वेबसाइटला भेट द्याल तितक्या कुकीज आपण निवडता आणि या कुकीज इंटरनेट स्पीड कमी करते. म्हणून जेव्हा संगणकात इंटरनेट स्लो चालत असते तेव्हा सर्व प्रथम हिस्ट्री आणि कुकीज हटवा.
वेबसाइटलाही समस्या असू शकतात
बर्याच वेळा आम्ही वेगवेगळ्या वेबसाइट्स शोधतो, पण जेव्हा त्या उघडत नाहीत तेव्हा आपण इंटरनेटला दोष देत असतो. मात्र, वेबसाइट देखील यामागील कारण असू शकते. त्याच वेळी इंटरनेट सर्व्हर आणि वेबसाइट दोन्हीमध्ये ऑपरेशनल समस्या असू शकते आणि हे बॉट्स किंवा डीडीओएस (डिस्ट्रीब्यूटेड डेनियल ऑफ सर्विस) चे आक्रमण देखील असू शकते. हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे जो नेटवर्क खंडित करतो, यामुळे इंटरनेट सेवा मंदावते. त्याच वेळी, इंटरनेट स्लो होते कारण बरेच लोक एकाच वेळी त्याच वेबसाइटवर शोधत असतात.
सिस्टम मेकॅनिक सॉफ्टवेअरचा वापर
सुरुवातीला हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी एका महिन्यासाठी शुल्क आकारले जात नाही, परंतु नंतर त्या वापरासाठी फी आकारली जाते. सिस्टम मेकॅनिक एक प्रकारचे सॉफ्टवेअर पॅकेज आहे जे आपल्या संगणकाची कार्यक्षमता कमी करण्यात मदत करते. यासह, संगणकाशी संबंधित समस्या दूर करण्यात देखील मदत करते. ज्यामध्ये कुकीज किंवा इतर आयटम आहेत. हे सॉफ्टवेअर खराब वायफाय कनेक्शनला ऑप्टिमाइज करते आणि स्टोरेजची जागा ओपन जेणेकरून आपला पीसी वेगाने सर्फ होऊ शकेल. त्याच वेळी, सिस्टम मेकॅनिक सॉफ्टवेअर संगणकाच्या इनर वर्किंग प्रोसेस ट्रॅक करते ज्यामुळे इंटरनेटचा वेग कमी होत नाही.
जर वाईफाई राउटर असेल तर
आपल्या खोलीपर्यंत वायफाय राउटर इंटरनेट सर्व्हिस बीम आहे, परंतु जोपर्यंत आपण रेंज मध्ये आहेत तोपर्यंत आपल्याला चांगली सेवा मिळेल. बऱ्याचदा हे राऊटर रेंज असलेल्या सर्वच ठिकाणी चांगले चालतील याची देखील शास्वती देता येत नाहा. जर समस्या राउटरची असेल तर आपण वाय-फाय राउटर बूस्टर केबल वापरावी जेणेकरुन चांगले सिग्नल मिळेल.
इंटरनेट सर्विस किंवा पीसी अपग्रेड करा
आपली इंटरनेट सर्विस सत्तत स्लो चालत असल्यास आपल्या इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर चेक करा. कदाचीत तुम्हाला सर्विस अपग्रेड करण्याची आवश्यकता असेल. अपग्रेड केल्याने तुम्हाला नक्की फरक जाणवेल बऱ्याचदा इंटरनेट सर्विससोबतच तुम्हाला तुमचा पीसी अपग्रेड करण्याची आवश्यकता असते. तुम्ही दररोज पीसी वापरतअसाल तर वेळोवेळी तुमचा पीसी अपग्रेड करत राहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.