TVS Introduces Apache RTR 160 Racing Edition with New Design 
विज्ञान-तंत्र

TVS Apache Bike : टीव्हीएसची नवी बाईक आहे एकदम भारी! फीचर्स जबरदस्त अन् किंमत देखील परवडणारी; जाणून घ्या

TVS New Bike : भारतातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांची लोकप्रिय Apache RTR 160 ची एक नवीन आवृत्ती लाँच केली आहे.

Saisimran Ghashi

TVS Motors : भारतातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांची लोकप्रिय Apache RTR 160 ची एक नवीन आवृत्ती लाँच केली आहे. कंपनीने रेसिंग एडिशन ही बाईक ₹1.28 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) या किमतीत बाजारात आणली आहे. या नवीन आवृत्तीसाठी देशभरातील ग्राहकांसाठी बुकिंग सुरु झाली आहे.

या रेसिंग एडिशनमध्ये डिझाइन, रंग आणि वैशिष्ट्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ही लाँच Apache RTR 160 ची ब्लॅक एडिशन आल्यानंतर एक महिन्याच्या आत आली आहे. या रेसिंग एडिशनची किंमत Apache च्या इतर सर्व मॉडेल्सपेक्षा जास्त आहे.

नवी Apache RTR 160 रेसिंग एडिशनमध्ये सर्वात आकर्षक बदल म्हणजे त्याचा रंग आणि ग्राफिक्स आहे. ही बाईक विशेष मॅटर ब्लॅक रंगात उपलब्ध आहे जो स्पोर्टी दिसतो. त्यासोबतच रेस-प्रेरित कार्बन फायबर ग्राफिक्स, रेसिंग एडिशन लोगो आणि लाल अलॉय व्हील्स आहेत.

इंजिन आणि परफॉर्मन्स

TVS Apache RTR 160 रेसिंग एडिशनमध्ये कंपनीने त्यांचं असलेलं 160cc एअर-कूल्ड इंजिनच वापरले आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत येते आणि 8,750 rpm वर 15.8 bhp इतकी कमाल पॉवर आणि 6,500 rpm वर 12.7 Nm इतका टॉर्क निर्माण करू शकते. या बाईकची टॉप स्पीड 107 किमी प्रति तास आहे.

वैशिष्ट्ये

TVS मोटर कंपनीने या नवीन आवृत्तीमध्ये Apache RTR 160 ची वैशिष्ट्ये जुन्या मॉडेल्सप्रमाणेच ठेवली आहेत. यात स्पोर्ट, अर्बन आणि रेन असे तीन राइड मोड्स आहेत. तसेच कमी गतीने सहज चालण्यासाठी ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी आहे. त्याचबरोबर, टीव्हीएस स्मार्टएक्सकनेक्ट असलेले तेच डिजीटल एलसीडी क्लस्टर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT