twitter banned more than 50000 indian account know details here  google
विज्ञान-तंत्र

Twitter ने बॅन केले 50 हजारांहून अधिक भारतीय अकाऊंट, जाणून घ्या काय आहे कारण

सकाळ डिजिटल टीम

ट्विटरने 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान बाल लैंगिक शोषण आणि न्यूडीटी यासारख्या कंटेंटचा प्रचार करणाऱ्या 52,141 भारतीय खात्यांवर बंदी घातली. इलॉन मस्कने नुकतेच विकत घेतलेल्या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने देशातील दहशतवादाला प्रोत्साहन देणारी 1,982 खाती देखील काढून टाकली आहेत.

IT नियम 2021 अंतर्गत अनेक बदल

ट्विटरने नवीन IT नियम, 2021 अंतर्गत सादर केलेल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, त्यांना भारतीय वापरकर्त्यांकडून तक्रार निवारण यंत्रणेद्वारे एकाच वेळेत 157 तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यापैकी 129 URL वर कारवाई करण्यात आली. याशिवाय, कंपनीने ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याचे आवाहन करणाऱ्या 43 तक्रारींवर कारवाई केली. या सर्वांचे निराकरण करण्यात आले असून योग्य प्रतिसाद पाठवण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले आहे. नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत, 5 मिलीयनहून अधिक वापरकर्ते असलेल्या मोठ्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मासिक अनुपालन अहवाल प्रकाशित करावा लागतो.

कंपनीने सांगितले की परिस्थितीचे पुनरावलोकन केल्यानंतर, आम्ही यापैकी कोणत्याही खात्याचे निलंबन मागे घेतले नाही. सर्व खाती निलंबित आहेत.

गेल्या महिन्यात, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटले होते की लहान मुलांच्या अश्लील कंटेंट तक्रारींवर ट्विटरकडून देण्यात आलेली उत्तरे अपूर्ण आहेत आणि आयोग त्या उत्तरांबाबत समाधानी नाही. मालीवाल यांनी 20 सप्टेंबर रोजी ट्विटर इंडिया पॉलिसी हेड आणि दिल्ली पोलिसांना महिला आणि मुलांचा समावेश असलेल्या अश्लील कंटेंट आणि बलात्काराचे व्हिडिओ दाखवणाऱ्या ट्वीट्सबद्दल समन्स बजावले होते.

लहान मुलांशी संबंधित लैंगिक गुन्ह्यांचे खुलेआम व्हिडिओ आणि फोटो दाखविणाऱ्या अनेक ट्विटची स्वत:हून दखल घेत आयोगाने म्हटले आहे की, बहुतांश ट्वीटमध्ये मुले पूर्णपणे नग्न असल्याचे दाखवण्यात आले होते आणि त्यातील अनेकांमध्ये लहान मुले आणि महिलांवर झालेले आत्याचारही दाखवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT