Twitter Blue Service in India for Rs 900 Charges announced by company 650 per month for Bev Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter : भारतात ९०० रुपयांत ट्विटर ब्‍लूची सेवा

कंपनीकडून शुल्क जाहीर; बेवसाठी ६५० रुपये महिना

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटने भारतात त्यांच्या सेवेच्या ब्लू टीक पडताळणीसाठी तब्बल ९०० रुपये महिना शुल्क आकारण्यात येणार आहे. भारताबरोबरच जगातील १५ देशांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, जपान, ब्रिटन आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे.

जगातील अब्जाधीश उद्योगपती आणि टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर डिसेंबरपासून ब्लू टीक सशुल्क करण्यात आले होते. यात अँड्रॉइडचा वापर करणाऱ्यांसाठी आठ डॉलर आणि आय फोनसाठी ११ डॉलर प्रती महिना शुल्क आकारण्यास सुरुवात झाली होती. ट्विटरने संस्थांसाठी ‘ट्विटर व्हेरिफिकेशन’ अशी सेवाही सुरू केलेली आहे.

भारतातील ट्विटर ब्लूचे शुल्क

  • मोबाईलवरील सेवेसाठी ९०० रुपये प्रति महिना (अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रणालींसाठी)

  • ट्विटर वेबरील सेवेसाठी ६५० रुपये प्रति महिना

  • बेववरील वापरकर्त्यांसाठी वार्षिक शुल्क योजनाही सादर करणार आहे यासाठी सहा हजार ८०० रुपये आकारण्यात येईल

ट्विटर ब्लूच्या सेवा

  • अमेरिकेत सबस्क्राइबरला चार हजार अक्षरांपर्यंत प्रदीर्घ ट्विट करण्याची परवानगी

  • ट्विटर ब्लू सबस्क्राइबरला जाहिराती कमी दिसणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT