Twitter Blue : मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने अखेर त्यांची प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवा ट्विटर ब्लू भारतात लॉन्च केली आहे. (Twitter Blue Launches In India )
हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम
भारतातील मोबाइल युजर्सना ब्लू टिक मिळवण्यासाठी आणि प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेचे फिचर्स वापरण्यासाठी दरमहा 900 रुपये द्यावे लागणार आहेत. तर, वेब युजर्ससाठी 650 रुपये मोजावे लागणार आहे.
ट्वीटरकडून गेल्या वर्षीच ट्विटर ब्लू यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह काही देशांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीची ही सेवा आता भारतात लाँच करण्यात आली आहे.
अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही मोबाईलसाठी ट्विटर ब्लूसाठी दरमहा 900 रुपये आणि वेब वापरकर्त्यांना 650 रुपये प्रति महिना भरावे लागणार अससल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
इलॉन मस्कने कंपनी विकत घेतल्यानंतर काही दिवसांनी पेड सबस्क्रिप्शन सेवा आणण्याची घोषणा केली होती. प्रचंड टीका झाल्यानंतरही ही सेवा सुरू करण्यात आली.
ट्विटर ब्लू यूजर्सना मिळणार या सुविधा
कंपनीच्या म्हणण्यानुसार, पेड सबस्क्रिप्शन घेणार्या यूजर्सला एडिट ट्विट बटण, 1080p व्हिडिओ अपलोड, रीडर मोड आणि ब्लू टिकची सुविधा मिळेल. याशिवाय कंपनीने त्यांची जुनी व्हेरिफीकेशन प्रोसेसदेखील बदलली आहे.
जुन्या ब्लू टिक युजर्सना त्यांची ब्लू टिक कायम ठेवण्यासाठी काही महिन्यांचा अतिरिक्त कालावधी दिला जाईल. त्यानंतर या सर्वांना पेड सदस्यता घ्यावी लागेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
ट्वीटरकडून सर्वात प्रथम युनायटेड स्टेट्स, कॅनडा, यूके, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्ये ब्लू टिकची सशुल्क सदस्यता सेवा सुरू केली होती. त्यानुसार कंपनीने Google चे Android वापरकर्ते आणि iOS वापरकर्ते Twitter Blue चे मासिक सदस्यता $11 (सुमारे 900 रुपये) मध्ये खरेदी करू शकतील.
त्याच वेळी, कंपनीकडून वार्षिक योजनादेखील जारी करण्यात आली आहे. त्यासाठी ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शनची वार्षिक किंमत 84 डॉलर म्हणजेच सुमारे 6,800 रुपये ठेवली आहे. म्हणजेच एका वर्षासाठी पैसे भरण्यावर सूट देण्यात आली आहे. ट्विटर वेब वापरकर्त्यांसाठीही हीच किंमत निश्चित करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.