twitter edit button twitter will store digital history of edited tweets  Sakal
विज्ञान-तंत्र

गुड न्यूज! अखेर ट्विटरला 'एडीट बटण' मिळणार, काय असेल खास? वाचा

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून ट्विटर चर्चेत आहे. वापरकर्ते बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत होते ते फीचर अखेर Twitterला मिळणार आहे ते म्हणजे एडीट हे बटण. ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइटला एडीट बटण कधीच मिळणार नाही अशी घोषणा केल्यानंतर अनेक वर्षांनी ट्विटरने त्यांचे हे म्हणणे अखेर खोटे ठरवले आहे. कारण ट्विटर लवकरच वापरकर्त्यांना एडीट बटण देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वापरकर्त्यांना हे फीचर मिळाले तरी, तरीही ट्विटर तुमच्या सर्व ट्विट्सची नोंद ठेवणार आहे.

टिपस्टर जेन मनचुन वोंगने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही ट्विटरवर एडिट बटण दाबल्यावर तुमच्या पहिले ट्विटमद्ध्ये दुरुस्ती होण्याएवजी एक नवीन ट्विट तयार केले जाईल. वोंगने एक ट्विट करत स्पष्ट केले की एडिट फंक्शन कसे बदलता न येण्याजोगे असू शकते, म्हणजेच ट्विटरचे हे फीचर “immutable” असेल, जे वापरकर्त्यांनी ट्विट केलेली मूळ प्रत डिजिटल स्वरूपात सेव्ह करेल. वापरकर्त्यांच्या मूळ ट्विटशिवाय, ते देखील थ्रेडमध्ये सेव्ह करेल. याचा अर्थ ट्विटर तुमच्या ट्विटची मागील आवृत्ती सेव्ह करत एडिट केलेले एक नवीन ट्विट तयार करेल.

याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, आपण ट्विटमध्ये कोणते बदल केले आहेत ते तुम्ही विसरलात तरी ट्विटर ते कधीही विसरणार नाही. ट्विटर स्वतःच्या वापरासाठी रेकॉर्ड ठेवेल की एडिट केलेल्या ट्विटची माहिती सर्व फॉलोअर्सद्वारे किंवा फक्त खातेधारकांना दाखवली जाईल अद्याप हे स्पष्ट नाही. ट्विटर त्याच्या एडिट बटण बाबत काय निर्णय घेईल ते हे फीचर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाल्यास कळू शकते. रिपोर्टमध्ये असेही सुचवण्यात आले आहे की, वापरकर्त्यांना फीचरसाठी पैसे भरले तरच त्यात एक्सेस मिळू शकतो. याचा अर्थ, Twitter फक्त Twitter Blue वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध करून देऊ शकते.

यापूर्वी, ट्विटरने आपल्या अधिकृत खात्यावर पोस्ट केले होते की, ते नवीन एडीट बटणावर काम करत आहे. सोशल मीडिया साइटला एडिट बटण मिळावे की नाही याबाबत टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या ट्विटर पोलला श्रेय देण्यासही ट्विटरने नकार दिलाय. एडिट बटण ही Twitter वापरकर्त्यांसाठी आनंददायी बातमी असली तरी, यामुळे काही सुरक्षा समस्या उद्भवतात ज्यांना ट्विटरने एडिट बटण रोल आउट करण्यापूर्वी दूर करणे आवश्यक आहे.

ट्विटरचे उत्पादन प्रमुख जे सुलिवन एडिट बटन दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या चिंतेबद्दल बोलताना म्हणाले की, एडिट हे अनेक वर्षांपासून ट्विटरचे सर्वाधिक मागणी करण्यात आलेले फीचर आहे. लोकांना (कधी कधी लाजिरवाणा) चुका, टायपोज आणि हॉट टेक त्याक्षणीच दुरुस्त करायच्या असतात. ते सध्या डिलीट करून आणि पुन्हा ट्विट करुन काम चालवत आहोत. वेळ मर्यादा, नियंत्रण आणि पारदर्शकता यासारख्या गोष्टींशिवाय ट्विट एडीट करता येणे याचा गैरवापर सार्वजनिक संभाषणाचे संदर्भ बदलण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या संभाषणाची विश्वासार्हता आबाधीत ठेवणे याला आमते सर्वोच्च प्राधान्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT