Twitter Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter: इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांवर आणले वाईट दिवस, कामावर घेऊन जावा लागतोय टॉयलेट पेपर

ट्विटरला खरेदी केल्यापासून इलॉन मस्क आपल्या निर्णयाने सर्वांनाच धक्का देत आहे. आता कर्मचाऱ्यांना कामावर चक्क टॉयलेट पेपर घेऊन यावा लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Twitter employees bring their own toilet paper: ट्विटरला खरेदी केल्यापासून इलॉन मस्क आपल्या निर्णयाने सर्वांनाच धक्का देत आहे. ट्विटरची मालकी स्वतःकडे आल्यानंतर मस्क यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. आता याचे परिणाम दिसू लागले आहेत. रिपोर्टनुसार, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावर टॉयलेट पेपर घेऊन येण्यास सांगितले जात आहे. कंपनीच्या ऑफिसमधील बाथरूममधून घाण वास येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना टॉयलेट पेपर घेऊन यावे लागत आहे.

बाथरूम स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. जास्त पैशांची मागणी करत हे कर्मचारी संपावर गेले होते. तसेच, ऑफिसमध्ये आता सिक्योरिटी सर्व्हिस देखील उपलब्ध नाही.

सफाई कर्मचारी नसल्याने ऑफिसचे बाथरुम खराब झाले आहेत. ऑफिसमध्ये शिल्लक राहिलेल्या जेवणाची दुर्गंधी येते. तसेच, सप्लायर्सला बदलण्यासाठी कर्मचारी नसल्याने टॉयलेट पेपर घरून आणावे लागत आहेत.

हेही वाचा: Car price hike: नववर्षात कार खरेदी करण्याचा विचार आहे? खिशावर पडणार अतिरिक्त भार, कंपन्यांचा मोठा निर्णय

आणखी एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, कर्मचाऱ्यांना दोन मजल्यावर शिफ्ट करण्यात आले आहे. तर इतर ४ मजले बंद करण्यात आले आहे. तसेच, कंपनीने सिएटल बिल्डिंगचे भाडे देणे बंद केल्याने कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. केवळ न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को येथील ऑफिस सुरू राहतील. मस्क यांनी न्यूयॉर्क ऑफिस येथील सफाई कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. त्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची टेस्ला आणि स्पेसएक्ससाठी नियुक्त केले आहे.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT